Header Ads Widget

 


करमाळा-प्रतिनिधी
 
           स्पर्धा परिक्षेतील पूर्व परीक्षेनंतर लिपिक पदासाठी राज्यस्तरीय एकच कट ऑफ लावावा. अशी मुख्य मागणी एमपीएससी समन्वय समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. एका शिष्टमंडळाच्या माध्यमातून ही मागणी करण्यात आली. यामध्ये स्पर्धा परीक्षा समावेश समितीचे कार्याध्यक्ष महेश घरबुडे, युवा सेनेच्या शर्मिला येवले, काँग्रेसचे बळीराम डोळे, विद्यार्थी वैभव लोमटे आदि समिती सदस्य यावेळी उपस्थित होते.
             स्पर्धा परीक्षा समन्वय समितीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेण्यात आली. नुकतीच प्रसिद्ध झालेली एमपीएससी गट-ब आणि गट-क संयुक्त जाहिरातीत लिपिक-टंकलेखक पदाचा पूर्व परीक्षेनंतर प्राधिकरणनिहाय कट ऑफ लावण्याच्या निर्णयामुळे, रीपीटेड टॉपर विद्यार्थी अनेक प्राधिकरणात मुख्य परिक्षेसाठी गणले जातील. यामुळे मुख्य परीक्षेचा कट ऑफ कमालीचा वाढून हजारो उमेदवारांच्या मुख्य परिक्षा देण्याच्या संधी नाहकपणे हिरावल्या जातील. लिपिक पदाच्या ७ हजार ३४ जागा असल्याने मुख्य परीक्षेस उदा. १२ पट उमेदवारांना, ७ हजार ३४ × १२ = ८४ हजार ४०८ उमेदवारांना संधी प्राप्त व्हावी. व पूर्व परीक्षेनंतर लिपिक पदासाठी राज्यस्तरीय एकच कट ऑफ लावावा ही मुख्य मागणी आहे. राज्यसेवाप्रमाणे सर्व विभागांचे विकल्प घेण्यात येवून, फक्त अंतिम निवड यादी लावतानाच त्याचा विचार व्हावा. असे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांना दिले असून, सामान्य प्रशासन विभाग तसेच आयोगासोबत तत्काळ चर्चा करून मार्ग काढावा. अशी मागणी समन्वय समितीने यावेळी केली आहे.

          एमपीएससी आयोगाकडून गट क व ब जाहिराती प्रसिद्ध झाली आहेत. यामध्ये लिपिक टंकलेखन पदाच्या परीक्षेचा राज्यस्तरीय एकच कट ऑफ लावावा. यामध्ये ही काही त्रुटी आहेत. त्या निदर्शनास आणून मुख्य मागणीकडे लक्ष वेधले आहे. आयोगासोबत बैठक घेऊन तोडगा काढावा अशीही विनंती केली आहे. खासदार शिंदे साहेबांनी दोन दिवसात एमपीएससी आयोगा सोबत बैठक लावण्याचे आश्वासन दिले आहे.

 महेश घरबुडे- कार्याध्यक्ष स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य 

Post a Comment