Header Ads Widget

 


केम-प्रतिनिधी (संजय जाधव)
 
             मंंगलदीप पब्लिक स्कूल केम येथे ७४वा‌ "भारतीय प्रजासत्ताक दिन" मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बुध्द, फूले, शाहू, आंबेडकर बहुउद्देशीय समाजसेवी संस्थेचे अध्यक्ष महेश‌ ओहोळ यांच्या हस्ते झेंडा वंंदन‌ करण्या आले. या प्रसंगी अनेक विद्यार्थांंनी आपले मनोगत व्यक्त केले‌. व प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर  वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये नंबर आलेल्या विद्यार्थांचा शालेय साहित्य व सर्टिफिकेट देऊन‌, मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

          कार्यक्रमास सौ. कुर्डे, सौ. उघडे, श्रीमती ओहोळ, सौ. भिल्ल, सौ. जोती कुर्डे, श्रीमती भोसले सुरवसे टोणपे उपस्थित होते. स्वागत प्रा. महेश ओहोळ, मुख्याध्यापीका सौ. कांबळॆ मॅडम तसेच शाळॆच्या सह-शिक्षक, सौ. देवकर मॅडम, सौ. सरवदे मॅडम, कु. गाडे मॅडम, वायदंडे, कु. केंदळऀ मॅडम यांनी उपस्थित पाहूण्यांचे स्वागत केले‌. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केला. उपस्थित अनेक पालकांनी सर्व विद्यार्थ्यांना खाऊ तयार करून‌‌, खाऊचे वाटप स्वतःच्या हस्ते केले. या प्रसंगी मंगलदीप पब्लिक स्कूलच्या‌ मुख्याध्यापिका सौ. सुजाता कांबळॆ मॅडम यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले. व आभार‌ कु. शिवानी गाडे मॅडम यांनी मानले.

Post a Comment