Header Ads Widget

 


 केम-प्रतिनिधी (संजय जाधव) 

           जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कविटगाव येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. सरपंच शिवाजी सरडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी मनमोहक सामुहिक कवायत, साहित्य कवायत आणि आकर्षक असे मानवी मनोरे तयार करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी प्रशासकीय सेवेत नव्याने रुजू झालेले, अक्षय चौधरी व मोनू कवडे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.                या कार्यक्रमाला सरपंच शिवाजी सरडे उपसरपंच भाऊसाहेब जगदाळे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष विष्णू पाटील, मा सरपंच जोतीआबा भोसले, ग्रामपंचायत सदस्य अक्षय शिंदे, राजेश पांडव, ग्रामविकास अधिकारी वाघमारे भाऊसाहेब, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मणराव जगदाळे, उपाध्यक्षा जुलेखा शेख व अनेक मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.

            कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका शिंदे मॅडम, वीर मॅडम, आहेरकर मॅडम, जगदाळे सर, भालचंद्र गावडे सर आणि खराडे सर यांनी परिश्रम घेतले. शेवटी मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. खराडे सर यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


Post a Comment