करमाळा-प्रतिनिधी (प्रविणकुमार अवचर)
गाव भेट दौऱ्या दरम्यान मौजे मांगी येथील ग्रामस्थांच्या प्रश्नांवर आमदार शिंदे यांनी सडेतोड उत्तरे दिली. काही दिवसांपासुन आ. संजयमामा शिंदे यांनी तालुक्यातील गावांना गाव भेट दौऱ्याला सुरुवात केली आहे. दौऱ्यादरम्यान गावातील समस्या सोडविणे, गावातील विकास कामाबद्दल माहिती घेणे, गटारी ,पाणी, वीज ,रस्ते गरजूंना घरकुल उपलब्ध करून देणे, जिल्हा परिषद शाळां बद्दल सुधारणा करणे, गावातील विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देणे, प्रत्यक्षात गावातील लोकांसमोर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निरसन करणे. यासाठी आ. संजयमामा शिंदे यांनी काढलेल्या गाव भेट दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, आज गुरुवार दिनांक 19 जानेवारी रोजी रावगाव गटातील विविध गावांना मामांनी भेटी दिल्या. या भेटीदरम्यान मांगी येथे आले असता, त्यांचे स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना मांगी ग्रामपंचायत सदस्य स्नेहल अवचर यांनी केली. यावेळी सुजित बागल व ग्रामस्थांनी आ.शिंदे यांचा ग्रामस्थांतर्फे सत्कार केला. यानंतर ग्रामस्थांनी अनेक समस्यांची निवेदने संजयमामांना दिली. हि सर्व निवेदने स्वीकारून ग्रामस्थांना त्यांच्या समस्यांचे लवकरात लवकर निरसन करू असे आश्वासन दिले. मांगी गावाचा मुख्य प्रश्न म्हणजे मांगी तलावात कुकडीचे पाणी सोडणे हा होता. याबाबत निवेदन सादर केले असता, आ. शिंदे यांनी कुकडीचे पाणी मांगी तळ्यात न येणे विषयी अनेक तांत्रिक अडचणी कागदपत्राच्या पुराव्यांसह ग्रामस्थांसमोर मांडल्या. तरी या त्रुटी कमी करून येणाऱ्या काळात मांगी तलावात कुकडीसह उजनी धरणाचे पाणी कायमस्वरूपी मिळवून देण्यात येईल असे आश्वासन दिले. पुढे बोलताना आ. शिंदे यांनी ग्रामस्थांना स्पष्ट शब्दात सांगितले की, मी फक्त मतं मागण्या पुरता गोड बोलत नाही. मी करमाळा तालुक्याचा आमदार म्हणून प्रत्येक गावाचा, प्रत्येक मतदाराचा मी तेवढाच आदर करतो. एखाद्या गावात मला कमी मत पडली म्हणून मी त्या गावावरती दुर्लक्ष न करता, इतर गावांप्रमाणेच त्या ही गावाचा जास्तीत-जास्त विकास कसा करता येईल!!! किंवा त्या गावाला जास्तीत जास्त निधी कसा देता येईल!!! यावरती मी जास्तीत जास्त भर दिला आहे. अशा प्रकारे आ. शिंदे यांनी त्यांचे विचार मांडले. यावेळी या कार्यक्रमासाठी उद्धव माळी, तानाजी झोळ, एडवोकेट राहुल सावंत, संभाजी बागल, स्वीय सहायक विकास वीर, पत्रकार प्रवीण अवचर, यांचे सह मांगी ग्रामपंचायत सदस्य सुजित बागल, कु. स्नेहल अवचर ,शहाबाई नरसाळे, चतुराबाई शिंदे ,ग्रामसेवक सरडे, आरोग्यसेवक पवार, तलाठी ढवळे, ग्रां.पं. शिपाई संजय सोनवणे, पोलीस पाटील आकाश शिंदे, महिला बचत गट प्रतिनिधी सौ. रेखा चव्हाण ,यांच्यासह मांगी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.




Post a Comment