वैराग-प्रतिनिधी (ओंकार गायकवाड)
बार्शी येथे माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या वाढदिवसानिमित्त भवानी पेठ येथील, जय भवानी तरुण गणेश मंडळ, बार्शी यांच्या वतीने लोकमान्य टिळक न.पा.शाळा क्रमांक ५ बार्शी, येथे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी युवानेते योगेश सोपल, माजी नगरसेवक मुन्ना शेटे, बापू वडेकर, उद्योजक महेश यादव, रुपेश बंगाळे, गवळी मॅडम, गिराम मॅडम हे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रशांत व्यवहारे, जगदीश परदेशी, श्रीशैल्य तपकीरे, स्वप्निल शेटे, शुभम शेटे, महेश जाधव, जाफर शेख, ईश्वर साखरे, विशाल परदेशी, सरफराज शेख यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका कदम मॅडम यांनी तर आभार सोनटक्के सर यांनी मानले.



Post a Comment