करमाळा-प्रतिनिधी
पंचायत समितीचे मा.उपसभापती दत्तात्रय सरडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चिखलठाण ता. करमाळा, येथे सुश्राव्य अशा भजनाचे आयोजन करण्यात आले आहे. या भजनासाठी ह.भ.प. शिवाजी सितारे, ह.भ.प. सोमा ढोले, ह.भ.प. अनिल सितारे, ह.भ.प. कल्याण सरडे, ह.भ.प. यादव हे सर्वजण भजनाची सेवा बजावणार आहेत. तरी सदरील भजन संध्या. ठिक ८.०० वा. सुरु होणार आहे. सदरील सुश्राव्य भजन "संघर्ष न्यूज सोलापूर" या युट्यूब चॕनेलवरुन थेट प्रक्षेपित केले जाणार आहे. तरी तालुक्यातील वारकरी, टाळकरी, माळकरी तसेच सर्व स्तरातील नागरिकांनी या भजनाचा घरी बसुन आनंद घ्यावा. असे आवाहन करमाळा पंचायत समितीचे मा. उपसभापती दत्तात्रय सरडे यांनी केले आहे.


Post a Comment