Header Ads Widget

 


केम-प्रतिनिधी (संजय जाधव)
 
         करमाळा शहरचे उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेनेचे शहर अध्यक्ष समीर हलवाई यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. प्रथम आई कमलाभवानी मंदिरात विधीवत पूजा करण्यात आली. नंतर देवीचा माळ येथील मुखबधीर शाळेत विद्यार्थ्यांना शिवसेनेचे संजय शिंदे व पत्रकार जयंत दळवी यांच्या हस्ते जेवणाची सोय करण्यात आली. व या शाळेतील मागणीनुसार शाळेला डिश अँटेना देण्यात आला.

           यानंतर उपजिल्हा रुग्णालयात रुग्णाना फळे वाटप करण्यात आले. सदरील फळेवाटप हॉस्पिटलचे डॉ. गजानन गुंजकर, डॉ. अभंग, ढाकणे मॅडम, शिंदे मॅडम व हॉस्पिटलचे कर्मचारी यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी शिवसेनेचे ता. संघटक संजय शिंदे, पत्रकार जयंत दळवी, युवासेनेचे जिल्हा उपाध्यक्ष मयूर यादव, पप्पु चोरमले, गणेश सावंत, किशोर शिंदे, रोहन साळुंखे, अप्पा खडके, विनीत कोथमिरे, सोनू वारे, आकाश गायकवाड, आदित्य जाधव हे उपस्थित होते.

Post a Comment