करमाळा-प्रतिनिधी
करमाळा येथील जीन मैदान येथे झालेल्या टेनिस बाॅल क्रिकेट एकदिवसीय स्पर्धेत, अंतिम सामन्यात दहिगाव संघाला नमवत गजानन क्रिकेट संघ विजयी ठरला आहे. या स्पर्धेत करमाळा तालुक्यातील आठ प्रमुख संघांनी सहभाग नोंदविला होता. अंतिम सामन्यात रोहित परदेशी, अमित बुद्रुक, मिलिंद दामोदरे ,अविनाश सावंत यांच्या उत्तम कामगिरीने आणि गजानन संघातील सर्व खेळाडूंनी केलेल्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर प्रथम पारितोषिक पटकावले आहे. या स्पर्धेसाठी कमलेश कदम ,समीर सय्यद ,बंटी भडंगे, बापू सावंत, शकुर भाई ,उमेश सुरवसे, सचिन गायकवाड यांचे सहकार्य लाभले. तर या स्पर्धेचे समालोचन शाहरुख मुलाणी व अक्षय कांबळे यांनी केले. पंच म्हणून रितेश कांबळे आणि मयूर कांबळे यांनी काम पाहिले.



Post a Comment