Header Ads Widget

 


करमाळा-प्रतिनिधी
              सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना करमाळा तालुक्यातील पशुधन लम्पी आजाराने गतप्राण होत आहे. जनावरांना योग्य उपचार मिळत नसल्यामुळे, बळीराजाच्या नजरेसमोर पशुधन मरत आहेत. तरीही पशुसंवर्धन विभागाला जाग येत नाही. लम्पी आजाराने ज्या शेतकऱ्यांची जनावरे मरण पावली आहेत. त्यांना तातडीने आर्थिक मदत करण्यात यावी. सोलापूर जिल्ह्यातील वारकरी संप्रदायातील वृद्ध कलावंतांना मानधन जास्त मिळावे. सोलापूर जिल्ह्यातील दरवर्षी हजार वृद्ध कलावंतांना मानधन देण्यात यावे. कोरोना काळामध्ये भजन कीर्तन प्रवचन हे बंद असल्यामुळे, कित्येक वारकऱ्यांना उपासमारीची वेळ आली होती. या विविध मागण्यांसाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली.
           यावेळी निवेदन देण्यासाठी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे मार्गदर्शक भजन सम्राट ह. भ. प. मच्छिंद्र अभंग महाराज, मृदंगाचार्य ह. भ. प. विजय अभंग महाराज, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे कार्याध्यक्ष ह. भ. प. अण्णासाहेब सुपनवर, ह. भ. प. आबासाहेब तरंगे, ह. भ. प. आबासाहेब शिंदे, ह. भ. प. सुखदेव वाघ, ह. भ. प. सर्जेराव शिंदे, ह. भ. प. अंबादास घरबुडे आधी वारकरी संप्रदायाचे महाराज उपस्थित होते.

Post a Comment