Header Ads Widget

 


करमाळा-प्रतिनिधी
              श्री क्षेत्र संगोबा येथे प्रासादिक मंचरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम तीन दिवसीय कीर्तन महोत्सव, गुरुवर्य ह. भ. प. आप्पासाहेब वासकर महाराज पंढरपूरकर यांच्या फडाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी काल्याचे किर्तन ह. भ. प. विठ्ठल पाटील यांचे झाले. त्यांनी आपल्या मधुर व रसाळ वाणीतून सर्वांना मंत्रमुग्ध केले. रामायण, महाभारत या ग्रंथातील दृष्टांत देऊन भाविकांना भावनिक उपदेश केले. प्रासादिक मंचरी ग्रंथ हा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा हस्तलिखित ग्रंथ असून, तो ग्रंथ मंचर गावामध्ये ह. भ. प. श्री गुरुवर्य मल्लाप्पा वासकर महाराज  यांना प्रासादिक मंचरी ग्रंथ मिळाला. श्री गुरु देववत्त उर्फ राणा महाराज वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक राज्यांमधून वारकरी संप्रदायाचे वारकरी व भाविक भक्त जमा झाले होते. करमाळा तालुक्यातील अनेक गावातून भाविक भक्त उपस्थित होते.

Post a Comment