करमाळा-प्रतिनिधी
धन्यवाद दिनाच्या निमित्ताने शेतकऱ्यांना व कष्टकरी वर्गाला धन्यवाद देऊन त्याचे आभार मानून, बाळासाहेबांच्या युवासेनेने अनोखा उपक्रम साजरा केला. भारतासारख्या शेतीप्रदान देशात धन्यवाद देण्याचे सर्वात मोठं श्रेय हे फक्त शेतकरी वर्गाला जाते. असे बाळासाहेबांच्या युवासेनेचे जिल्हा समन्वयक निखिल चांदगुडे यांनी त्यांचे विचार मांडले. पुढे बोलताना निखिल चांदगुडे म्हणाले कि, पुढील काळात हि मा.आ.नारायण पाटील, जिल्हा अध्यक्ष महेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व युवासैनिक अशाच प्रकारे चिकाटीने काम करतील असा आशावाद चांदगुडे यांनी व्यक्त केला. यावेळी वरकटणे, करमाळा येथे शेतकऱ्यांचे तोंड गोड करून त्यांचे आभार मानण्यात आले. युवासेनेचे शहर अध्यक्ष विशाल गायकवाड यांनी शेतकऱ्यांचे कौतुक करून शेती व आरोग्य विषयक प्रश्न सोडवण्याची ग्वाही दिली. यावेळी युवासेनेचे दादासाहेब तनपुरे, लखन शिंदे, विशाल पाटील, सिद्धेश्वर मस्कर, आप्पा देवकर, सतीश तनपुरे, लालासाहेब पाटील, बबन पाटील, जानकीनाथ देवकर, राहुल कोकाटे, शिवाजी तनपुरे, बाळासाहेब कदम, प्रताप देवकर, चंद्रकांत पाटील, अजिंक्य माने, भाऊ देवकर, लहू कोकाटे, निलेश पाटील, महेश तनपुरे, पांडुरंग तनपुरे, लखन पाटील आदीजन उपस्थित होते.



Post a Comment