Header Ads Widget

 


करमाळा-प्रतिनिधी (प्रशांत भोसले)
                सावडी ता.करमाळा येथील विकी महादेव सोनवणे यांनी राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या गेलेल्या (MPSC) परिक्षेत घवघवीत यश मिळवत, एक सर्व सामान्य कुटुंबापासून ते राज्य कर निरिक्षक (STI) पदापर्यंत धैर्याने वाटचाल करणाऱ्या विकी महादेव सोनवणे यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ.) कामगार आघाडीच्या वतीने यशवंत गायकवाड यांनी सन्मान केला. यावेळी गायकवाड बोलताना म्हणाले कि, विकीचा सत्कार म्हणजे त्याच्या जिद्दीचा, चिकाटीचा व अथक प्रयत्नाचा सत्कार आहे. त्याच्यामुळे समाजातील तरुणांना एक वेगळी प्रेरणा मिळेल. अशाप्रकारचा आशावाद गायकवाड यांनी व्यक्त केला.
            या सत्काराला विकी सोनवणे यांनी प्रत्युत्तर देताना म्हणाले कि, परिस्थिती हलाखीची होती व समाजातून नेहमीच निगेटिव्ह विचार ऐकायला मिळायचे. परंतू परिस्थितीचे व निगेटिव्ह विचारांचे भांडवल न करता, १२-१२ तास अभ्यास करून धेयाच्या दिशेने वाटचाल केली. व यशाला गवसणी घातली आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीचा कधीच बाऊ करु नका. त्याचप्रमाणे मला मिळालेल्या यशाचा समाजातील तरुणांसाठी कशाप्रकारे उपयोग होईल. यासाठी मी नेहमी तयार असेन, असे प्रतिपादन सोनवणे यांनी मांडले. ‌यावेळी सौ.गिता गायकवाड, वैजयंता गायकवाड, बहिण रेखा सोनवणे व आई भामाबाई सोनवणे इ.जण उपस्थित होते.

Post a Comment