Header Ads Widget

 


केम-प्रतिनिधी (संजय जाधव)
              केम तालुका करमाळा येथील नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात, बालदिन व पंडित नेहरू जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 14 नोव्हेंबर पंडित नेहरू जयंती व बालदिन साजरा करण्यात येतो. यानिमित्त इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे चेअरमन सुदर्शन तळेकर, प्राचार्य रणदिवे सर, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या वेळी मनोरंजनात्मक मुलींचे खेळांमध्ये हलगीच्या तालावर संगीत खुर्ची घेण्यात आली.


Post a Comment