Header Ads Widget

 


करमाळा-प्रतिनिधी
 
                संविधानाचे जनक विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये भारतीय संविधान दिन साजरा करताना, भारतीय बौद्ध महासभा तालुका उपाध्यक्ष बौद्धाचार्य सावताहरी कांबळे यांनी त्रिसरण, पंचशील वंदना घेऊन प्रास्ताविक केले. यावेळी कांबळे म्हणाले की, भारतीय संविधान आणि घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन साजरा केला जातो. भारत सरकारच्या वतीने महाराष्ट्रभर महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे १२५ वे जयंती वर्ष साजरे केले जात असताना, त्यांना एक प्रकारची श्रद्धांजली वाहण्यासाठी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी पहिली राज्यघटना प्रदान केली. तोच आजचा संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. संविधान सभेने दोन वर्षे, ११ महिने, अठरा दिवस या दीर्घ कालावधीत संविधान पूर्ण केले. संविधानाबाबत जनजगृती करण्यासाठी आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने, देशभरात २६ नोव्हेंबर हा दिवस 'संविधान दिन' म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने २४ नोव्हेंबर २००८ ला आदेश काढून '२६ नोव्हेंबर' हा दिवस देशभर संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. असे बौद्धाचार्य कांबळे यांनी या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना विचार व्यक्त केले.

           याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे संघटक बाळासाहेब कसबे व बौद्धाचार्य किरण मोरे यांनी भारताचे संविधान प्रस्ताविकाचे वाचन करून, घटनेचे शिल्पकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा कार्यकारणी सदस्य सुभाष ओहोळ, महाराजा कांबळे, दशरथ (देवा) कांबळे, सुहास ओहोळ, शाहीर बन्सी कांबळे, अजय कांबळे, मंगेश समिंदर,आशिष कांबळे, गोल्टी वाघमारे, कालिदास कांबळे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे युवा मंचचे अध्यक्ष युवराज जगताप, सुमंत नगरचे सामाजिक कार्यकर्ते नामदेव लोंढे, विलास ससाने, सुनील विभुते, प्राध्यापिका सुवर्णा कांबळे इत्यादीं सह अनुयायी उपस्थितीत होते. सामाजिक बांधिलकी जोपासत कालकथित रतिराज किसन जानराव यांच्या स्मरणार्थ फळ वाटप करण्यात आले. व भीमसेना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयकुमार कांबळे यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला सिद्धार्थ नगर, भिम नगर, सुमंत नगर मधील व सर्व क्षेत्रातील सामाजिक, राजकीय कार्यकर्ते उपस्थितीत होते.

Post a Comment