उपळवटे-प्रतिनिधी (संदिप घोरपडे)
माढा तालुक्यातील उपळवटे गावचे युवा नेते अनिल जाधव यांची "मी वडार महाराष्ट्राचा" सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी फेरनिवड निवड झाल्यामुळे, त्यांचे जिल्ह्यातुन विविध ठिकाणाहून अभिनंदन केले जात आहे. सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदाच्या निवडीचे पत्र संस्थापक अध्यक्ष विजय चौगुले व प्रदेश कार्याध्यक्ष सुरेश धोत्रे तसेच पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रवी शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले. सदरिल निवडीमुळे उपळवटे गावातील बजरंग चौकामध्ये एकच जल्लोष करण्यात आला. यावेळी उपस्थित "मी वडार महाराष्ट्राचा" संस्थापक अध्यक्ष विजय चौगुले, प्रदेश कार्याध्यक्ष सुरेश धोत्रे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रवी शिंदे, करमाळा तालुका अध्यक्ष सागर पवार, बाळू शिंदे, सचिव किरण डिकोळे, उपळवटे गावचे माजी उपसरपंच प्रकाश खूपसे-पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.



Post a Comment