वैराग-प्रतिनिधी (ओंकार गायकवाड)
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत वादग्रस्त वक्तव्य केले. त्यावरुन संपूर्ण महाराष्ट्रातून राज्यपालांचा निषेध केला जात आहे. परंतु बार्शी काँग्रेसने वेगळ्याच पद्धतीने राज्यपालांचा निषेध नोंदवला आहे. यापुर्वी देखील राज्यपाल कोश्यारी यांनी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या विवाहाबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये करून अपमानास्पद शब्द वापरले होते. राज्यपाल कोश्यारी हे वारंवार वादग्रस्त वक्तव्ये करुन महाराष्ट्रातील शांतता भंग करीत असून, त्यांची तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी. यासाठी बार्शी शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा काळ्या शाईने पोस्ट कार्डवर निषेध नोंदवण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष विजय साळुंके, तालुकाध्यक्ष सतीश पाचकुडवे, युवक काँग्रेस बार्शी विधानसभा अध्यक्ष निखिल मस्के, शहराध्यक्ष संतोष शेट्टी, अल्पसंख्यांक विभागाचे वसीम पठाण, बप्पा सुतार, माणिक पवार, अक्षय चव्हाण, प्रसाद आदी पदाधिकारी उपस्थित होते.



Post a Comment