Header Ads Widget

 


करमाळा-प्रतिनिधी
              आज जिल्हा परिषद शाळा कोंढेज व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरकटणे या शाळेमध्ये जाऊन शिक्षक, विद्यार्थी व मुले यांना बालविवाह संदर्भात, कैलास फाउंडेशन नवी दिल्ली व संत गाडगेबाबा ग्रामीण विकास संस्था फडतडी या संस्थेच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा उपक्रम शाळेमध्ये राबविण्यात येत आहे. यामध्ये मुले 186, मुली 157 शिक्षक- शिक्षिका 14 असे एकूण 357 लोकांची बालविवाहासंदर्भात जनजागृती करण्यात आली. तसेच यापुढे त्यांच्या पालकांना व बचत गटातील महिलांना माहिती देण्याचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. सदरिल माहिती मुलांना आवश्यक तर वाटलीच आहे. परंतु त्यांनी आपल्या आई-वडिलांना या उपक्रमाची माहिती देणार असल्याचे सांगितले आहे. त्याचप्रमाणे यासंदर्भात पालकांचे प्रबोधन व जनजागृती करावी असे सुचवण्यात आले. संबंधित उपक्रमाची माहिती हनुमंत गोडसे संत गाडगेबाबा ग्रामीण विकास संस्था यांच्याकडून शाळेतील मुलांना तसेच शिक्षकांना देण्यात आली आहे.

Post a Comment