करमाळा-प्रतिनिधी
शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये या महापुरुषांचा सतत अवमान कारक वक्तव्ये करून, कायम स्वरूपी चर्चेत रहाण्याचा प्रयत्न करणारे, त्याच प्रमाणे महाराष्ट्र राज्य आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या बाबतीत देखील वादग्रस्त वक्तव्ये करणारे, सन्माननीय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज बहुजन अस्मिता असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीत बेताल वक्तव्य केले आहे. नुकतेच खा.राहुल गांधी यांनी "भारत जोडो" यात्रा मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बाबतीत पुराव्या सहित जे वक्तव्य केले आहे. त्याच्या निषेधार्थ BJP ने खा.राहुल गांधींच्या प्रतिमेस जोडो मारो आंदोलन केले. तसेच मनसे ने देखील काळे झेंडे दाखवले. मग आता बहूजन समाजाची अस्मिता असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीत बेताल वक्तव्ये करणारे, वाचाळवीर भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रतिमेस BJP जोडो मारो आंदोलन करणार का? मनसे राजभवन येथे काळे झेंडे दाखवणार का? किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पेक्षा सावरकर त्यांना महत्वाचे वाटतात काय? आता या पक्षांनी त्यांची भूमिका आंदोलन करुनच स्पष्ट करावे. असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करमाळा तालुका अध्यक्ष हनुमंत मांढरे-पाटील यांनी केले आहे.



Post a Comment