करमाळा- तालुक्यातील साखर कारखान्यांनी दुसरा उसाच्या बिलापोटी हप्ता काढावा अशी मागणी केली होती. कमलाई साखर कारखान्याने या मागणीची दखल घेऊन दीडशे रुपये प्रमाणे व राहिलेली एफ. आर. पी. ५५ रुपये परत देऊ असा शब्द दिला आहे. म्हणून करमाळा ऊस दर संघर्ष समितीने कमलाई सहकारी साखर कारखान्यावरील आंदोलन स्थगित केले आहे. भैरवनाथ व मकाई सहकारी साखर कारखान्याने सुद्धा आपला दुसरा हप्ता जाहीर करावा. हप्ता जर जाहीर न केल्यास भैरवनाथ व मकाई सहकारी साखर कारखान्यावर सुद्धा तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल. याची त्यांनी दखल घेऊन ताबडतोब दुसरा हप्ता ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा. कमलाई साखर कारखान्यावर होणारे "ठेचा भाकर आंदोलन" स्थगित केले आहे. अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र गोडगे, बहुजन संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ कदम, बळीराजा शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर, रयत क्रांती शेतकरी संघटनेचे प्रांतिक सदस्य अजय बागल, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुदर्शन शेळके, बळीराजा शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष भीमराव येडे, रयत क्रांती शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष शिवशंकर जगदाळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष अमोल घुमरे यांनी दिली आहे





Post a Comment