Header Ads Widget

 


करमाळा-प्रतिनिधी 

                येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त, त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा व 9 महाराष्ट्र बटालियन, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय एकता दौड रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. 

           या रॅलीमध्ये विद्या विकास मंडळाचे सचिव विलास घुमरे सर, विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, करमाळा पोलीस स्टेशनचे API जगताप साहेब, API कुंजीर साहेब, API जगदाळे साहेब, महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य नागेश माने, कलिम काझी, माजी विस्तार अधिकारी अनिल बदेसाहेब, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य कॅप्टन संभाजी किर्दाक, राष्ट्रीय सेवा योजना + 2 स्तरचे जिल्हा समन्वयक प्रा. लक्ष्मण राख, एन.सी.सी.चे सी.टी.ओ. निलेश भुसारे व एन.सी.सी.चे कॅडेट मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


Post a Comment