केम तालुका करमाळा येथील कृष्णाई दूध संस्थेच्या वतीने दिपावली निमित्त एकूण 75 सभासदांना दिवाळीच्या साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये दोन किलो साखर, दोन किलो हरभरा, दोन किलो रवा, एक तेलाची पिशवी व मोती साबण या किटचे वाटप आदर्श सेवानिवृत्त शिक्षक तुकाराम तळेकर यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी दूध संस्थेचे चेअरमन कालिदास तळेकर तसेच दूध उत्पादक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केम परिसरात काही दिवासांपुर्वी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. आणि अशा परिस्थितीमध्ये दिवाळी हा मोठा सण साजरा करण्यासाठी, शेतकऱ्यांना कर्ज काढून दिवाळी सण साजरा करावा लागेल. अशी परिस्थिती उद़्भवलेली होती. केम परिसरामध्ये अशा प्रकारे दिवाळी सण साजरा करण्यासाठी सहकार्य केले जात असल्यामुळे, संस्थेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात असुन, यावेळी दूध उत्पादक सभासदांनी ही आनंद व्यक्त केलेला आहे.
केम-प्रतिनिधी (संजय जाधव)




Post a Comment