Header Ads Widget

 


करमाळा-प्रतिनिधी
                  23/10/2022 रोजी पंढरपूर येथे सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांचा ऊस दर किती असावा? यासाठी सर्व शेतकरी संघटना यांनी ऊस परिषद आयोजित केली होती. त्या मध्ये असा निर्णय झाला कि, सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांचा ऊस दराची पहिली उचल 2500 व फायनल 3100 रू दर जाहीर करून कारखाने सुरू करावेत. व दर जाहीर न करता कारखाने सुरू केले तर संघर्ष अटळ आहे. व त्याअनुषंगाने तीव्र आंदोलनाचे पडसाद पंढरपूर तालुक्यात उमटलेही आहेत. तरीही करमाळा तालुक्यातील कारखानदार कारखाने सुरू करण्याच्या तयारीत आहेत. परंतू ऊस दर संघर्ष समिती करमाळा यांच्या वतीने आम्ही सांगतो कि, करमाळा तालुक्यातील ऊस वाहतूकदार यांनी मागणी केलेला दर जाहीर होत नाही, तोपर्यंत ऊस वाहतूक करू नये. शेतकऱ्यांना सहकार्य करावे. 
            कारण आज शेतकरी पुर्ण उध्वस्त झालेला आहे. आणि तो पुर्ण वैतागून गेलेला आहे. ऊस दर संघर्ष समितीचे आंदोलन शेतकऱ्यांनी हातात घेतले आहे. तरी वाहतूकदारांना कोणता हि नेता काही हि सांगेल. तर त्यांना सांगा, ज्या वेळी इलेक्शन असेल त्या वेळी आम्ही तुमच्या प्रचारासाठी अवश्य पळू. परंतु आता माझ्या बापाच्या घामाचा आपमान तुम्ही करू नका. तरी कुठल्या ही ऊस वाहतूकदाराने 3100 रू ऊस दर जाहीर होत नाही, तोपर्यंत ऊस वाहतूक करू नये. स्वत शेतकरी आता रस्त्यावर उतरले आहेत. आणि काही शेतकऱ्यांना ही विनंती आहे की, कुठल्याही नेत्याने तुमचे घर चालविलेले नाही. तरी त्यांना सांगा कि, भीक नाही तर आमच्या घामाचा दाम मागत आहोत. असे सांगुन 3100 रु. दराचीच मागणी करा. निवडणुका आल्या की तुमचे भोंगे आम्हीच वाचवतो. तुम्ही कितीही खोटे बोलला तरी तुमचेच किती खरे आहे. हे आम्ही लोकांना ओरडून सांगतो. त्यामुळे आता दर जाहीर करेपर्यंत आमच्या ऊसाला कोयता लाऊ नका. असे प्रत्येकाने आपापल्या नेत्याला ठणकावून सांगा.
                त्याचप्रमाणे आपल्या हक्कासाठी आपण सर्व शेतकरी व ऊस वाहतूकदार यांनी आंदोलनात सहभाग घेतला पाहिजे. असे आवाहन "करमाळा ऊस दर संघर्ष समिती"च्या वतीने, स्वाभिमानी शेतकरी संघटना करमाळा तालुका अध्यक्ष सुदर्शन शेळके यांनी केले आहे.

Post a Comment