केम तालुका करमाळा येथील श्रुती दूध संकलन व शितकरण यांच्या वतीने दिपावली निमित्त एकूण 200 सभासदांना दिवाळीच्या साहित्याची वाटप करण्यात आले. यामध्ये पाच किलो साखर, मोती साबण व पॅराशूट बाॅटल असे साहित्याचे किट कृषी सहायक प्रताप तळेकर, व दत्तात्रय चव्हाण यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या वर्षी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी त्याना दिलासा म्हणून या साहित्याचे वाटप करण्यात आले.
या वेळी महेश तळेकर अवचर दाजी, समाधान तळेकर, राजू तळेकर, मोहन काळे, पप्पु अवघडे, भैय्या मोरे, शिवाजी मोळीक, रमेश तळेकर मागीलाल, नाना पाटील उपस्थित होते. या वेळी दिपावलीच्या सणासाठी किट मिळाल्याने सभासदांनी आनंद व्यक्त केला. या उपक्रमाचे केम व परिसरातून स्वागत केले जात आहे.
केम-प्रतिनिधी (संजय जाधव)





Post a Comment