डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या करमाळा तालुकाध्यक्ष पदी साप्ताहिक पवनपुत्र पोर्टलचे संपादक दिनेश मडके यांची निवड झाली आहे. मडके यांची डिजिटल मिडिया क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व घटकांचे हित जोपासण्यासाठी, आणि डिजिटल माध्यमातून सामाजिक मुल्य तसेच जबाबदारीच्या चौकटीत कार्यरत करण्यासाठी, डिजिटल मिडियाचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी ही निवड केली आहे. पत्रकार दिनेश मडके हे कुणबी मराठा समाजसेवा संघाचे तालुकाध्यक्ष असून, करमाळा तालुका पत्रकार संघाचे तालुका उपाध्यक्ष आहेत. तर जीवनज्योत सामाजिक संस्थेचे अध्यक्ष असून, मडके यांनी जगद्गुरु नरेद्रांचार्य महाराज भक्त सेवा मंडळाचे अकरा वर्ष तालुकाध्यक्ष, जिल्हाप्रसिध्दी प्रमुख म्हणुन काम केले आहे. गेली चौदा वर्षापासुन पत्रकारिता क्षेत्रात काम करीत आहेत. त्यांच्या निवडीबद्दल करमाळा तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
डिजीटल मिडिया संघटनेच्या माध्यमातुन तालुक्यातील पत्रकारांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवण्याचा मानस असुन, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष गुरुवर्य राजा माने साहेब, जिल्हाध्यक्ष सतिश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकारांसाठी काम करणार असल्याचे सांगितले. लवकरच तालुका कार्यकारिणी करणार असुन, या संघटनेत सहभागी होण्यासाठी पत्रकार बांधवांनी संपर्क साधावा. असे आवाहन तालुकाध्यक्ष दिनेश मडके यांनी केले आहे.डिजिटल मिडिया पत्रकार संघटनेच्या करमाळा तालुकाध्यक्ष पदी दिनेश मडके यांची निवड....
करमाळा-प्रतिनिधी



Post a Comment