करमाळा तालुक्यातील केम येथील इंदिरा नगर अंगणवाडी सेविका अंजली लोंखडे व मदतनीस रंजना मच्छिंद्र कावळे यांना सन २०१९-२०२० या वर्षी उल्लेखनिय काम केल्याबद्दल सोलापूर जिल्हा परिषदेचा "आदर्श पुरस्कार" मिळाला आहे. आरोग्य सेवेसाठी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे योगदान मोठे आहे. गरोदर माता, स्तनदा माता यांच्या आरोग्याकडे लक्ष देऊन बालकांचे, मातांचे प्राण वाचविण्याचे काम यांनी चांगल्याप्रमाणे केल्याबद्दल, या कामाची दखल घेऊन हा पुरस्कार, सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने मिळाला आहे.
हा पुरस्कार जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार, जिल्हा कार्यअधिकारी जावेद शेख, प्रकल्प अधिकारी मानेसाहेब आदि मान्यवर उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल माजी सरपंच अजित तळेकर, सरपंच आकाश भोसले, उपसरपंच नागनाथ तळेकर, ग्रामविकास अधिकारी नलवडे, करमाळा तालुका शिवसेना महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. वर्षा चव्हाण, केम केंद्रप्रमुख महेश कांबळे, सुपरवायझर आतकर मॅडम, कांबळे मॅडम, अंगणवाडी सेविका टांगडे मॅडम, सुनिता बरकडे, कुरडे, राणी तळेकर, सविता गावडे यांनी अभिनंदन केले आहे. त्याचप्रमाणे लोखंडे व कावळे या दोघींचे हि केम परिसरातून कौतुक केले जात आहे.केम येथील अंगणवाडी सेविका अंजली लोंखडे व मदतनीस रंजना कावळे यांना आरोग्य सेवेतील उत्कृष्ट कार्याबद्दल आदर्श पुरस्काराने केले सन्मानित
केम-प्रतिनिधी (संजय जाधव)



Post a Comment