पांडे येथील किशोर दुधे, मिरगव्हण येथील धुळादेव घरबुडवे, अर्जुननगर येथील समाधान भोगे यांच्या शेतामध्ये पाणी देत असताना घोणस जातीची आळी निदर्शनास आली आहे. त्यामुळे पांडे, मिरगव्हण परिसरातील शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पुर्वी तालुक्यामध्ये केतुर परिसरात घोणस आळी शेतकरीला चावली होती. त्यावेळी येथील शेतकऱ्याला उपचारासाठी करमाळा येथे खाजगी दवाखान्यात दाखल केले होते. उसा पिकावरील घोणस आळी व जनावरांना होत असलेल्या लम्पी आजारामुळे शेतकरी वर्गामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घोणस आळीने दंश केल्यास वेळेवर उपचार केल्यास काहीही होत नाही. घोणस आळीशी संपर्क झाल्यास पुरळ उठतात. साधारण एक तास वेदना होतात दमा, अॅलर्जी असलेल्याना त्रास होतो. जखमेवर थंड पाणी, सोडा लावल्यास त्रास कमी होतो. फारच त्रास झाल्यास डाॅ. सल्ला घ्यावा.कृषी सहाय्यक बी. जी. गाडे
घरगुती उपाय.....
आळीशी संपर्क आलेल्या जागेवर बर्फाचा तुकडा, खाण्याचा सोडा, पाणी मिश्रित लेप लावावा. तेथे रबिंग अल्कोहोल, कॅलोमन लोशन लावावे. शेतात जाताना पुरेसे अंग झाकले जाईल याची काळजी घ्यावी. आळी सदृश्य पिकांवर कडुलिंब, चुनासाॅस किंवा अन्य कीटकनाशक फवारावे.



Post a Comment