Header Ads Widget

 


करमाळा-प्रतिनिधी 

             रावगाव ता. करमाळा येथे सेवा पंधरवाडा रब्बी हंगाम प्रशिक्षण मोहीम तसेच कृषी सामाजिक समावेशन सेवा पंधरवाडा, त्यानिमित्त कांदा पिक शेतकरी प्रशिक्षण संपन्न झाले. यावेळी तज्ञ मार्गदर्शक म्हणून वसंतराव नाईक कृषि पुरस्कार प्राप्त शेतकरी उद्धव खेडेकर जालना यांनी, कांदा बीज उत्पादन व कांदा लागवडीपासून कांदा साठवणी पश्चात तंत्रज्ञान वापरून कांदा पिकाचे उत्पादन कसे वाढवायचे!!! या विषयावर शेतकऱ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी कुर्डूवाडी रवींद्र कांबळे यांनी कृषी विभागाच्या विविध योजना याविषयी, शेतकऱ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले. तसेच तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. "कांदा लागवड करण्यास येणाऱ्या अडचणी उत्पादकता" या विषयावर शेतक-यांनी खुल्या मनाने प्रश्न विचारले. या सर्व प्रश्नांचे निरसन खेडेकर सरांनी केले. या प्रशिक्षण शिबिरास अभूतपूर्व असा कांदा उत्पादक शेतक-यांचा प्रतिसाद लाभला. 

          यावेळी कार्यक्रमास उपस्थित मंडळ कृषी अधिकारी अनिल चव्हाण, कृषी पर्यवेक्षक संदीप गायकवाड व कृषी विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. शेवटी आभार प्रदर्शन मारुती जाधव सर यांनी केले. यावेळी रावगाव व पंचक्रोशीतील कांदा उत्पादक शेतकरी बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी कृषी सहाय्यक डी. व्ही. नवले व रावगांवकर ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment