Header Ads Widget

 


केम-प्रतिनिधी (संजय जाधव)

           करमाळा तालुका शिवसेना, युवासेनेच्या तालुका प्रमुख पदी शंभुराजे शाहुराव फरतडे तर शहर प्रमुख पदी समीर परदेशी यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनाप्रुख आदित्य ठाकरे यांनी पक्षाचे मुखपत्र असलेल्या दै. सामना मधून हि निवड जाहीर  केली आहे. या नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपात  असून, काम बघून सहा महिन्यानंतर कायम करण्यात येतील. असे युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी पत्रकात म्हटले आहे.

         या निवडीबद्दल विभागीय सचिव अक्षय ढोबळे, माढा लोकसभा विस्तारक उत्तम आयवळे, शिवसेना जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे, युवासेना जिल्हाप्रमुख सचिन बागल, तालुकाप्रमुख सुधाकर लावंड, शहर प्रमुख प्रवीण कटारीया, संघटक संजय शिंदे, माजी तालुकाप्रमुख शाहुराव फरतडे, महिला आघाडी तालुकाप्रमुख वर्षाताई चव्हाण, युवासेना जिल्हा समन्वयक सागर तळेकर, उपजिल्हाप्रमुख मयुर यादव, युवती सेना जिल्हा प्रमुख साक्षी भिसे, उपशहरप्रमुख प्रमुख प्रसाद निंबाळकर, करमाळा शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख श्रीहरी तळेकर, केम शहराध्यक्ष सतिश खानट, प्रसिद्धी प्रमुख अविनाश तळेकर, माजी ग्रामपंचायत सदस्य नवनाथ देवकर यांनी अभिनंदन केले आहे. या निवडीबद्दल समाधान फरतडे म्हणाले कि, सध्या शिवसेना पक्ष अडचणीत आला आहे. अशा परिस्थितीत माझाकडे युवासेना तालुकाप्रमुख पदाची जबाबदारी पक्षाने दिली आहे. हि जबाबदारी मी समर्थपणे पेलेल. तालुक्यातील प्रत्येक गावात युवासेनेची शाखा काढीन असे त्यांनी सांगितले.

Post a Comment