माढा तालुक्यातील टेंभुर्णी-केम एस. टि. कधी सुरु तर कधी बंद होत असल्यामुळे, नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दररोज सकाळी ०७.०० वा. केम-टेंभुर्णी एस. टि. चालू तर, १०.०० वा. ची टेंभुर्णी-केम एस. टि. बंद..... सायंकाळी पाच वाजता ची टेंभुर्णी केम एस टि बस सेवा बंद..... सायंकाळी ०८.०० वा. ची टेंभुर्णी-केम एस. टि. चालू, हे नेमकं काय चालले आहे? महामंडळ खाते असे का करत आहे, ह्याचे कारण अजुन नागरिकांना समजले नाही. उपळवटे गावातील नागरिकांनी कुर्डुवाडी एस. टि. आगार प्रमुख विजय हांडे यांच्याशी संपर्क साधला असता, आगारप्रमुखा कडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. लवकरात-लवकर एस. टि.च्या फेऱ्या सुरळीत नाही केल्या, तर वेगळे पाऊल उचलावे लागेल. असे उपळवटे गावचे युवा नेते हनुमंत चव्हाण यांनी इशारा दिला आहे.
उपळवटे-प्रतिनिधी (संदीप घोरपडे)



Post a Comment