रविवार दि. 18/9/2022 रोजी माळढोक पक्षी अभयारण्य वन क्षेत्रातील तलावा जवळ जखमी अवस्थेत कासव असल्याची बातमी सर्पमित्र प्रशांत भोसले व नागनाथ यादव यांना मिळाली होती. सदर ठिकाणी दोघांनी ही जाऊन जखमी कासवाला ताब्यात घेतले. व त्या कासवाला वनपरिक्षेत्र कार्यालय करमाळा येथे घेऊन आले. कार्यालयातील यादव जाधव यांनी सदरील कासवाची अवस्था योग्य आहे का नाही? याची प्राथमिक माहिती, वनपरिक्षेत्र अधिकारी व वनपाल गणेश झिरपे यांना दिली. त्यानंतर कासवाच्या इलाजासाठी पशुवैद्यकीय डॉ.साबळे यांना बोलावून, जखमी कासवावर योग्य प्रकारे उपचार करून, त्याच्या तोंडात अडकलेला माश्याचा गळ काढण्यात आला. त्यानंतर डॉक्टरांनी कासव सुस्थितीत असल्याची पुष्टी केली. व सर्वांना तशा प्रकारची खात्री दिली. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. व वेळीच तत्परतेने कासवाला योग्य उपचार मिळवून दिल्याबद्दल वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सर्पमित्र प्रशांत भोसले व नागनाथ यादव यांनी निसर्गातील एका अनमोल घटकाचे प्राण वाचविले असल्याबद्दल कौतुक करत अभिनंदन केले. संबंधित कासवाला अधिकारी, कर्मचारी व सर्पमित्र या सर्वांनी मिळून निसर्गाच्या सान्निध्यात सोडून दिले आहे. त्याचप्रमाणे यावेळी करमाळा शहरामधून विषारी नागाला भोसले यांनी पकडले होते. त्या विषारी नागाला सुध्दा निसर्गाच्या सान्निध्यात सर्वांनी मुक्त केले.
करमाळा-प्रतिनिधी (प्रशांत भोसले)



Post a Comment