केम गावातील व परिसरातील 10 ते 15 गावातील लोकांना, तुळजापूरला देवदर्शन, बार्शी येथे शेतकरी, नोकर वर्ग, कोर्ट कचेरीचे कामे व केम गावातील शालेय विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी जाण्या-येण्यासाठी सोय नसल्यामुळे, एक तर रेल्वे सेवा बंद झाल्यामुळे, या गावातील लोकांची अत्यंत गैरसोय होत होती. त्यामुळे केम व आजूबाजूच्या नागरिकातून केम-तुळजापूर बस सेवा सुरु करण्यासाठी मागणी होत होती. या गोष्टीची दखल घेत प्रहार जनशक्ती पक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, गावातील ग्रामपंचायत, सरपंच सदस्य व सुज्ञ नागरिकांनी मिळून बस सेवा किती महत्त्वाची आहे!!!! हे प्रशासनाच्या लक्षात आणून दिले. केम गावच्या सर्व नागरिकांनी अतितात्काळ ग्रामसभा घेत ग्रामसभेमध्ये केम-तुळजापूर एसटी चालू होण्यासाठी, केम ग्रामपंचायत यांनी ठराव मंजूर करून दिला. प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष संदीप तळेकर यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तसेच करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांचे पत्र, सचिन रणशिंगारे यांच्या पत्नी राष्ट्रवादी महिला युवा सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष यांच्या नावाने कुर्डूवाडी एस.टी. डेपो मॅनेजर मिथुन राठोड यांच्याशी पत्र व्यवहार केला. त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व केम गावच्या सुज्ञ नागरिकांच्या प्रयत्नामुळे, एसटी महामंडळ आगाराचे प्रमुख मिथुन राठोड यांनी सर्व बाबींचा विचार करून, केम-तुळजापूर एसटी बस सुरू करण्याचा निर्णय घेतला. यामुळे एसटी महामंडळालाही फायदा होणार आहे. त्याचप्रमाणे केम गाव व आजूबाजूच्या 15 ते 20 खेड्यातून विद्यार्थी, नोकरवर्ग, गोरगरीब शेतकरी, आराधी मंडळी देवदर्शनाला जाणाऱ्या इतर लोकांनाही या एसटीचा फायदा होणार असून, मंडळाचा सुद्धा आर्थिक फायदा होणार आहे.
तरी केम गावातील ग्रामस्थांनी व आजूबाजूच्या ग्रामस्थांनी या एसटीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. या सर्व गोष्टीचा पाठपुरावा प्रहारचे तालुकाध्यक्ष संदीप तळेकर, युवा नेते सचिन रणशिंगारे, भाजप करमाळा तालुका सरचिटणीस धनंजय ताकमोगे, सुहास वेदपाठक, दिलीप जाधव सर, एसटी ड्रायव्हर बाळासाहेब देवकर, कुबेर तळेकर यांनी केला आहे. त्यामुळे या सर्वांचे केम गावातील ग्रामस्थ व आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थांच्या वतीने कौतुक केले जात आहे.केम-तुळजापूर बस सेवा 26 तारखेपासून होणार सुरू.... प्रहार जनशक्ती पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच केम गावातील नागरिकांच्या मागणीला आले यश..
केम-प्रतिनिधी (संजय जाधव)



Post a Comment