माढा तालुक्यातील उपळवटे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने उपळवटे गावातील ग्रामदैवत, श्री काळभैरवनाथ मंदिरामध्ये विद्यार्थ्यांकडून निबंध स्पर्धा, चित्रकला व रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. आज सकाळी ठिक ११ वा. राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम जि.प.प्रा शाळेमध्ये घेण्यात आला होता. विद्यार्थ्यांना शाळेमध्ये चांगल्या प्रकारचे शिक्षण मिळत असुन, सर्व शिक्षक जातीने लक्ष घालून विद्यार्थी घडविण्याचे काम करत आहेत. असे उद़्गार गावचे युवा नेते विशाल खूपसे पाटील यांनी काढले आहेत.
यावेळी उपळवटे गावचे सरपंच बालाजी गरड पाटील, उपसरपंच दीपिका महेश देवडकर, ग्रामपंचायत सदस्य विशाल खूपसे पाटील, दिलीप खुपसे पाटील, राहुल घाडगे, महेश गोसावी, सुधामती शेळके, रब्बाना मुलाणी, तानाजी गायकवाड, शिक्षणप्रेमी अशोक गरड पाटील, उपळवटे जि.प.प्रा.शाळेचे मुख्याध्यापक आजिनाथ शिंदे सर, प्रकाश भवर, मोळीक हरीदास, अरविंद सुरवसे, मंदाताई खोसे मॅडम, जोतीराम तळेकर तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष ल सर्व सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.
उपळवटे-प्रतिनिधी (संदीप घोरपडे)



Post a Comment