केम येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त हर घर तिरंगा लावण्यात आला असल्याचे शिवसेना महिला आघाडीच्या वर्षा चव्हाण यांनी सांगितले आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक घरावर तिरंगा फडकत असलेला आपण पहात आहोत. भारत देशात पहिल्यांदाच हर घर तिरंगा लावण्यात आला आहे. हा आनंदाचा क्षण कधीही विसरता येणार नाही. असे प्रतिपादन वर्षा चव्हाण यांनी मांडले. दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या अभियानात केम येथील सर्व नागरिकांनी सहभाग घेतलेला आहे. राष्ट्रध्वज आपल्या सर्वांचा सन्मान व एकतेचे प्रतीक आहे.
यावेळी शिवसेना महिला आघाडी वर्षा चव्हाण, यशवंत सेना महिला आघाडी मंजुळा पळसकर, सुरेखा पळसकर, पुजा देवकर, शालिनी पवार, मयुरी केंगार, मनिषा माने, साधना केंगार, आर्चना शिंदे, राणी तळेकर, शोभा शिंदे, मंगल कावळे, मोनिका परदेशी, लक्ष्मी माने, सावित्री वाघमोडे, कोमल शिंदे, सायली चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
उपळवटे-प्रतिनिधी (संदीप घोरपडे)



Post a Comment