Header Ads Widget

 


केम-प्रतिनिधी (संजय जाधव)

                  श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केम येथील प्रशालेत 75‌ वा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ध्वजारोहण आकाश भोसले- सरपंच केम यांच्या हस्ते करण्यात आले. या अमृत महोत्सवी सोहळ्याला मा.जि.परिषद सदस्य- दिलीप तळेकर, सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दयानंद तळेकर तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य आणि उत्तरेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष दादासाहेब गोडसे, देवस्थान विश्वस्त मनोजकुमार सोलापूरे, भाऊसाहेब बिचितकर, मोहन आबा दोंड, स्वाधीन वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.अंकुश तळेकर, दशरथ तळेकर, भीमराव चौगुले, तलाठी भाऊसाहेब प्रदीप चव्हाण, प्रहार संघटनेचे अध्यक्ष संदीप तळेकर सचिन रणशृंगारे, धनंजय ताकमोगे, संभाजी गुरव, बाबुराव तळेकर, किरण तळेकर, रमजान मुलानी केम गावातील बहुसंख्य प्रतिष्ठित नागरिक प्रशालेत उपस्थित होते.

            शालेय व्यवस्थापन समितीतर्फे विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करण्यात आले. श्री उत्तरेश्वर देवस्थानचे अध्यक्ष दादासाहेब गोडसे यांनी उत्तरेश्वर देवस्थान तर्फे शालेय विद्यार्थ्यांना 780 जेवणाचे डब्बे दिले. केम गावातील प्रतिष्ठित नागरिक शिवाजी उत्तरेश्वर तळेकर यांनी विद्यार्थ्यांना सोनपापडी वाटप केली. केम ग्रामपंचायत यांच्या तर्फे विद्यार्थ्यांना शेंगदाण्याचे लाडू वाटप करण्यात आले.

         या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाघमारे के.एन सर यांनी केले. ध्वजारोहणाची तयारी प्रा.अमोल तळेकर सर यांनी केली. या सोहळ्याची क्षणचित्रे पाटील पी‌.डी सर यांनी टिपले. मुख्याध्यापक तथा प्राचार्य कदम एस.बी सर, पर्यवेक्षक सांगवे बी.व्ही सर तसेच प्राध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, प्रशालेतील आणि महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. प्रशालेत जल्लोषात 75 वा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला.

Post a Comment