प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, बच्चु कडू महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे, कार्याध्यक्ष बल्लू जवंजाळ यांच्या आदेशाने प्रहार जनशक्ती पक्षाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष दत्ता मस्के पाटील, सोलापूर शहराध्यक्ष अजित कुलकर्णी, सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख जमीर शेख, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष रमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, करमाळा तालुक्यात सर्व पंचायत समिती, दोन जिल्हा परिषद गट प्रहार संघटना ताकतीनिशी लढविणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यालयाच्या नेतृत्वाखाली, करमाळा तालुक्यामध्ये मागील तीन वर्षामध्ये शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात उठून, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम प्रहार संघटनेने केले आहे. उसाचे दराविषयी साखर कारखान्यावर आंदोलन करून ऊस दरवाढ करून, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला.
बँकांविषयी पीक कर्ज शेतकऱ्यांना मिळवून देण्याचे काम केले. कारखान्यांकडे अनेक महिन्यांपासून थकलेली उसाची बिले, कारखान्यावर आवाज उठवून अनेक शेतकऱ्यांना एक कोटी सत्तर लाख रुपये बील मिळवून दिले. विजेचा प्रश्न असो अथवा कांदा उत्पादन शेतकऱ्यांना चांगला भाव मिळायला पाहिजे. असा प्रश्न घेऊन आम्ही उठाव केला. कुकडी दहिगाव उपसा सिंचन प्रश्न असो, अथवा करमाळा तालुक्यात विजेच्या तारा निकृष्ट झाल्या आहेत म्हणून, हा विषय ऊर्जामंत्री नितिन राऊत यांना पत्र व्यवहार करून मंजूर करून घेतला. सर्वात मोठा विषय म्हणजे अनेकांचे जीव जात होते असा, जातेगाव-टेंभुर्णी रस्ता यासाठी अनेक संघटनांनी, सार्वजनिक बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार केला. पण कोणालाही रस्त्याचा प्रश्न सोडवता आला नाही. परंतु प्रहार संघटनेच्या माध्यमातून जातेगाव-टेंभुर्णी रस्त्याचे खड्डे बुजवण्याचे सर्वात मोठे काम प्रहार संघटनेचे करमाळा तालुकाध्यक्ष यांच्या नेतृत्वात केले गेले. यामुळे अनेक लोकांचे या रस्त्यामुळे जीव वाचले. केम-कंदर रस्ता, केम-पाथुर्डी रस्ता, हा सुध्दा प्रहार संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा केल्यामुळे मंजूर झाला आहे. असे अनेक प्रश्न मार्गी लावण्याचे काम प्रहार संघटना करत आहे. भाळवणी गावातील राष्ट्रीय पेजल योजना अंतर्गत काम मार्गी लावण्याचे प्रयत्न केला आहे. दिव्यांग बांधवांना पाच टक्के अपंग निधी प्रत्येक ग्रामपंचायत मधून मिळवून दिलेला आहे. विधवा निराधार महिला यांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत पेन्शन व अनेक महिलांना पेन्शन चालू केल्या. कोरोना काळामध्ये सर्वाधिक काम प्रहार संघटनेने केले आहे. जिल्हाध्यक्ष दत्ता मस्के-पाटील, सोलापूर शहराध्यक्ष अजित कुलकर्णी, कार्याध्यक्ष खालीद मणियार, संपर्कप्रमुख जमीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना पेशंटला बेड उपलब्ध करून दिले. त्यामुळे अनेक पेशंटला योग्य व मोफत उपचार घेता आले आणि संघटनेच्या माध्यमातुन ते केले सुध्दा.... अनेकांचे हॉस्पिटल बिले माफ केली. अनेक पेशंटला रक्ताचा तुकडा असताना रक्त उपलब्ध करून दिले. कोरोना महामारी काळामध्ये मोफत जेवण प्रत्येक तालुक्यामध्ये दिले. अन्नधान्य वाटप केले. प्रत्येक शेतकरी, विधवा महिला, अपंग, निराधार लोकांपर्यंत मदत करण्याचा प्रयत्न प्रहार संघटना करीत आहे. अनेक शेतकऱ्यांचे रस्त्याचे काम तहसील कार्यालयाच्या माध्यमातुन सोडवण्याचे काम संदीप तळेकर यांनी केले आहे. करमाळा तालुक्यातील कामगार केंद्र बंद होऊ नये. म्हणून महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री बच्चु कडू यांच्याकडे पाठपुरावा करून तो प्रश्न मार्गी लावण्यच काम केले. विविध सरकारी रखलेल्या योजनेला मंजुरी मिळण्यासाठी प्रयत्न केले. शेतकऱ्यांना कांद्याला भाव मिळत नव्हता, तर "रास्ता रोको" करून शेतकऱ्यांना न्याय मिळून दिला. कांद्याची बिले मार्केटमध्ये दिले जात नव्हते. तेच बील चेक स्वरूपात दिले जात होते. लोकांचे चेक बॉऊन्स झाले. यासंदर्भात प्रहार संघटनेने सोलापूर मार्केट यार्डमध्ये आवाज उठवून बिले मिळवून दिली. सदैव प्रहार संघटना शेतकऱ्यांच्या, गरिबांच्या, अपंगांच्या, महिला यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी असते. आम्ही दरवर्षी बच्चु कडू यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, असे समाज उपयोगी कार्यक्रम करत आहोत. असे अनेक प्रश्न घेऊन प्रहार संघटना, करमाळा तालुकाध्यक्ष संदीप तळेकर यांनी सदैव प्रयत्न करून सोडविले आहेत.करमाळा तालुक्यातील पंचायत समिती गण, जिल्हा परिषद गट प्रहार संघटना स्वबळावर ताकदीनिशी लढवणार...केम गटातुन संदिप तळेकर यांच्या पत्नी उतरणार रिंगणात
केम-प्रतिनिधी (संजय जाधव)








Post a Comment