राजपुत युवा संघटनेचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते नरेंद्रसिंह ठाकुर यांना सोलापुर सोशल फाऊंडेशनच्या सामाजिक कार्य गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासुन नरेंद्रसिंह ठाकुर हे सामाजिक काम करीत आहेत. पतित पावन संघटनेच्या माध्यमातुन त्यांनी समाजकार्याला सुरुवात केली असुन, त्यानंतर डाॅ. शामाप्रसाद मुखर्जी सामाजिक संस्थेच्या माध्यमातुन आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या, विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, खाऊवाटप, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण आदी सामाजिक उपक्रम राबविले.
त्यांच्या सामाजिक कार्यामुळेच संजय गांधी निराधार योजना सदस्य म्हणुन त्यांची निवड करण्यात आली. या निवडीमुळे त्यांनी गोरगरीब, वयोवृध्द, निराधार लोकांना आधार देण्याचे काम केले. अनेक युवकांना मार्गदर्शन केले आहे. अशा कार्याचा गौरव होणे ही गोष्ट नक्कीच अभिमानास्पद आहे. प्रामाणिकपणे, निरपेक्षपणे समाजाची निस्वार्थ भावनेने सेवा करणाऱ्या व्यक्तिस हा सन्मान मिळाला आहे. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल भाजप युवा मोर्चा प्रदेश सचिव दिपक चव्हाण, कुणबी मराठा समाजसेवा संघाचे अध्यक्ष पत्रकार दिनेश मडके, भाजपाचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे ,शहराध्यक्ष जगदिश आगरवाल ,सरचिटणीस अमरजित साळुंके, जिल्हा सरचिटणीस किरण बोकन, यशकल्याणी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील, नामदेव शिंपी समाज संघटनेचे अंकुश पिसे, ब्राम्हण संघाचे अध्यक्ष संतोष कुलकर्णी, सचिव बाळासाहेब होसिंग, सोनार समाजसंघटनेचे मनोज बुराडे, वीरशैव संघटनेचे शेखर स्वामी, बुरुड समाजाचे अध्यक्ष निखिल मोरे यांनी नरेंद्रसिंह ठाकुर यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.
करमाळा-प्रतिनिधी (प्रशांत भोसले)








Post a Comment