करमाळा-प्रतिनिधी
राज्याचे राजकारण ज्याप्रकारे दररोज वेगवेगळे वळण घेत आहे. त्याच धर्तीवर करमाळा राष्ट्रवादीमध्ये हि तालुकाध्यक्ष पदासाठी रस्सीखेच होताना दिसुन येत आहे. करमाळा राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पदी पुनश्च एकदा संतोष वारे यांची निवड झाली आहे. करमाळा राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष हनुमंत मांढरे-पाटील यांची १५/०५/२०२२ रोजी तालुकाध्यक्ष म्हणुन निवड करण्यात आली होती. हि निवड झाल्यावर वारे यांनी यांनी सांगितले होते कि, माझे तालुकाध्यक्ष पद काढल्याचे मला वरिष्ठांकडून तशाप्रकारचे कोणते हि आदेश आले नाहीत. परंतु मांढरे-पाटील यांची जर वरिष्ठांनी तालुकाध्यक्ष म्हणुन निवड केली असेल, तर माझा काही आक्षेप नाही. परंतु बऱ्याच दिवसांपासुन राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांचा नेहमीचाच मुंबई दौरा होत होता. राष्ट्रवादीचा प्रत्येक पदाधिकारी वरिष्ठांकडे काही ना काही काम घेऊन जातच असतो. परंतु याच कामांच्या आडून राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्ष या पदासाठी रस्सीखेच तर सुरु झाली नसेल ना? अशा प्रकारचा सुर आता स्थानिक राजकारणात आणि जनतेमध्ये दिसुन येत आहे. आता काही दिवसांवर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होत आहेत. आणि या निवडणुकांमध्ये तालुकाध्यक्षांची महत्वाची भुमिका असणार आहे. त्यामुळे सदरील तालुकाध्यक्ष पदावर परत आणखी कोणाची वर्णी लागल्यास आश्चर्य व्यक्त व्हायला नको.
तरी संतोष वारे यांची करमाळा तालुकाध्यक्ष म्हणुन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नियुक्ती केलेली आहे. व हनुमंत मांढरे-पाटील यांच्या तालुकाध्यक्ष पदाला स्थगिती देण्यात आलेली आहे. व संतोष वारे हेच तालुकाध्यक्ष पदावर कार्यरत राहतील. असे निवडीचे पत्र वारे यांना देण्यात आले आहे. सदरील निवडीप्रसंगी नुतन तालुकाध्यक्ष संतोष वारे, अभिषेक आव्हाड- राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्ष, दिपक आबा साळूंखे पाटील- राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष, उमेश पाटील- राष्ट्रवादी जिल्हा कार्यकारी अध्यक्ष इ. पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते.
राष्ट्रवादीला आता पहिल्यासारखी नवसंजीवनी येईल, व राष्ट्रवादीमध्ये जे गट-तट निर्माण झाले होते. त्याला कुठे तरी आळा बसेल. जरी मांढरे-पाटील यांचे तालुकाध्यक्ष पद संपुष्टात आले असले तरी त्यांना, कुठे तरी ॲडजस्ट करुन आम्ही सोबतच काम करणार आहोत.
अभिषेक आव्हाड (राष्ट्रवादी युवक काँग्रेस, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष)




Post a Comment