करमाळा-प्रतिनिधी (प्रशांत भोसले)
75 सामाजिक संस्थान सोबत योग यज्ञ आयोजित महा एनजीओ फेडरेशन व सहभागी संस्था, नवभारत प्रतिष्ठान रावगाव तालुका करमाळा जिल्हा सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने, जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. तसेच आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत 75 योग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन योग दिनानिमित्त करण्यात आले. विशेष सहकार्य चंद्रकांत राठी, संकल्पना शेखर मुंदडा यांच्या वतीने विद्यार्थ्यांनी योग करण्यासाठी सहभाग घेतला. आंतरराष्ट्रीय योग दिवस हा दरवर्षी 21 जून रोजी जगभरात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी याला मान्यता दिली आहे. योगा केवळ शारीरिक तंदुरुस्ती आणत नाही तर, जास्तीत जास्त मानसिक शांती देतो. यामुळे मन शांत राहते आणि तणाव कमी होतो. यामुळे हे शरीराच्या सर्व क्रियांवर देखील नियंत्रण ठेवते. सुख, दुख ,प्रेम यासारख्या जीवनातील सर्व अभिव्यक्तीवर योगाचे नियंत्रण असते.
या कार्यक्रमानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विद्यार्थी, सर्व शिक्षक तसेच दादासाहेब पवार, लक्ष्मण जौंजाळ, निंबाळकर बाळासाहेब, भवर, अजय पवार, हर्षद पवार, हेमंत पवार, प्रकाश कांबळे, ग्रामस्थ तसेच योग शिक्षक महेंद्र शिंदे, भैरू गबाले यांनी "योगाचे महत्व व आसने" याविषयी माहिती दिली. या कार्यक्रमास महा एनजीओ फेडरेशन यांचे मोलाचे सहकार्य लाभले. भास्कर पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.


Post a Comment