बहुजन सत्यशोधक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील ओहोळ यांच्या आदेशाने संघटनेचे जिल्ह्याचे नेते राजकुमार लांडगे यांनी बहुजन सत्यशोधक संघ करमाळा युवक तालुकाध्यक्ष पदी अनिकेत तुपसमीदर यांची निवड केली. यावेळी नूतन तालुकाध्यक्ष तुपसमीदर म्हणाले की, एस.सी., एस.टी., ओ.बी.सी. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून, त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करेन. एस.सी., एस.टी.वर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराचे प्रमाण वाढलेले असून, सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून करणार. असे त्यांनी त्यांचे यावेळी मनोगत व्यक्त केले. यावेळी संघटनेचे जिल्ह्याचे नेते राजकुमार लांडगे म्हणाले की, बहुजन सत्यशोधक संघ सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी निर्माण केली गेलेली संघटना आहे. अन्यायाच्या विरोधामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष सुनील ओहोळ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, खूप मोठ्या प्रमाणात संघटन वेगाने वाढत आहे. एस.सी., एस.टी.वर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराच्या विरोधामध्ये संघर्ष करणारी हि संघटना असून, भूमिहीन व त्यांचे प्रश्न असतील, बेरोजगारी, असंघटित कामगारांची समस्या, वेठ बिगार कामगारांच्या समस्यांसाठी लढणारे हे संघटन आहे. त्यामुळे महाराष्ट्रामधील युवक मोठ्या प्रमाणात संघटनेशी जोडला जात आहे. असे राजकुमार लांडगे म्हणाले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष नितीन वाघमारे, कुर्मदास साखर कारखाना संचालक नारायण गायकवाड, पँथर वडार संघटना महाराष्ट्र कार्याध्यक्ष राजकुमार धोत्रे, डॉ. कांतीदीप लोंढे, माढा तालुका उपाध्यक्ष संतोष जानराव, ज्येष्ठ नेते आप्पासाहेब ओहोळ, महेश गायकवाड, अमित ओहोळ ,सागर माने, गणेश गाडे, वैभव गाडे, अक्षय गाडे, सुजित गाडे, योगेश गाडे, उमेश गाडे, विलास धेंडे, दत्तात्रेय गाडे, बाळासाहेब भिसे, किरण गाडे, विशाल गाडे, नानासाहेब गाडे, विवेक गाडे, संतोष गाडे उपस्थित होते.
करमाळा-प्रतिनिधी (प्रशांत भोसले)



Post a Comment