केम-प्रतिनिधी (संजय जाधव)
करमाळा तालुक्यातील आदिनाथ कारखान्यातील सर्व कायम व हंगामी कर्मचाऱ्यांना कळविण्यात येते की, दिनांक 26//5/2022 रोजी विक्री झालेल्या साखरे वरील रुपये १५०/- रुपये प्रमाणे होणाऱ्या रकमेतून कर्मचाऱ्यांना पगार मिळण्यासाठी विचारविनिमय करण्यासाठी दि.1/6/2022 रोजी श्री आदिनाथ महाराज मंदिरासमोर सकाळी १० वा. मिटिंगसाठी हजर रहावे. दिनांक 26/05/2022 अखेर 89,500 क्विंटल साखर विक्री झालेली होती. सदर साखरेमध्ये कर्मचारी पगारासाठी रुपये 150/- प्रमाणे राखून ठेवलेली रक्कम, कर्मचारी पगारासाठी कारखान्याने बँकेस मागणी केलेली होती. त्यावर ती दिनांक 27/05/2022 रोजी एम. एस. सी. बँक पुणे यांनी लेखी पत्र कारखान्यास दिलेले आहे. त्यावरती बँकेने पत्रावरती नमूद केलेले आहे की, कर्मचारी युनियनच्या प्रतिनिधींनी संपूर्ण साखर विक्री झाल्यानंतरच, कर्मचाऱ्यांना पगार देण्यात यावा हे मान्य केले आहे. व तशी मागणी केलेली आहे.
त्यामुळे सध्या आपणास मिळणारा पगार मिळत नाही. त्यामुळेच कर्मचाऱ्यांनी मंदिरा समोर एकत्र येऊन एकमताने निर्णय घेण्यासाठी उपस्थित रहावे अशाप्रकारची विनंती वजा आवाहन कामगार नेते बापुराव तळेकर, कालीदास जाधव, खंडोजी देशमुख, आण्णासाहेब देवकर, बिभीषण आदलिंगे, सुंदर पवळ, राजकुमार घाडगे, हरिभाऊ शिंदे यांनी केले आहे.



Post a Comment