Header Ads Widget

 



 केम-प्रतिनिधी (संजय जाधव)

                  दिनांक 27/5/2022 रोजी दुपारी एक वाजता सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील खानापूर गावात राज्यमंत्री बच्चु कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून भव्य असा विवाह सोहळा पार पडला. यात हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्माच्या जोडप्यांनी सहभाग नोंदवला होता. संपूर्ण महाराष्ट्र भोंगा आणि हनुमान चालीसा या मुद्द्यावर पेटवून देण्याचा घाट इतर अनेक पक्षांनी घातला असताना, हिंदू आणि मुस्लिम धर्मातील अनेक लोकांना एकत्रित करून, दोन्ही धर्माचा सामुदायिक विवाह सोहळा एकत्रपणे लावत सोलापुर प्रहारने एक अनोखे उदाहरण महाराष्ट्र राज्यासमोर ठेवले असून, अक्कलकोट तालुक्याचे तालुका उपाध्यक्ष मोहम्मद मकानदार यांच्या पुढाकाराने सर्व टीमला सोबत घेत, भव्य आणि दिव्य असा हा विवाह सोहळा पार पाडला.


                   यावेळी शुभ आशीर्वाद पर बोलताना जिल्हाध्यक्ष दत्ता मस्के-पाटील यांनी या विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या दोन्ही धर्माच्या जोडप्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच बच्चू भाऊंच्या वतीने व सर्व प्रहार टिमच्या वतीने शुभाशीर्वाद दिले. पुढे बोलताना त्यांनी सांगितले कि, महाराष्ट्रात कोणता राजकारणी काय करतोय? याचं आम्हाला काही घेणे देणे नाही. परंतु सोलापूर जिल्ह्यात काम करत असताना लोकनायक वंदनीय बच्चुभाऊ कडू यांचा सेवा, त्याग, समर्पण, संघर्ष हा विचार सर्व जाती-धर्मातील लोकांना सोबत घेऊन घराघरात पोहोचवणार असल्याचे प्रतिपादन दत्ता मस्के-पाटील यांनी यावेळी केले.


                    या सामुदायिक विवाह सोहळ्याला जिल्हाध्यक्ष दत्ता मस्के-पाटील, शहराध्यक्ष अजित कुलकर्णी, शहर संपर्क प्रमुख जमीर शेख, शहर कार्याध्यक्ष खलिद मनियार, करमाळा तालुका प्रमुख संदिप तळेकर, दक्षिणचे ता. अध्यक्ष मोसिन भाई तांबोळी, अपंग क्रांतीचे संपर्क प्रमुख नितीन भाऊ, माळशिरस ता.अध्यक्ष संजय पवळ यांच्यासह बरेच कार्यकर्ते या अनोख्या विवाहसोहळ्यासाठी उपस्थित होते.

Post a Comment