Header Ads Widget

 



करमाळा-प्रतिनिधी (प्रशांत भोसले)

                करमाळा येथील पांडे गावामध्ये दि.25/4/22 रोजी आरोपी गहिनीनाथ अनारसे याने अमोल भोसले याला, तु डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा अध्यक्ष का झाला? आणि तु जयंती कशी काढतो तेच बघतो!!! असे म्हणून जीव मारण्याच्या हेतूने त्याच्या गाडीवर ट्रॅक्टर घातला. यामध्ये भोसले यांना थोडीफार दुखापत होत सुदैवाने जीव बचावला. भोसले यांनी त्याच रात्री दि. 25/4/22 रोजी ॲट्रॉसिटी ॲक्ट खाली गुन्हा दाखल केला. आज महिना उलटत गेला तरी अद्याप आरोपीला अटक केली नाही ही खेद जनक बाब आहे. याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) युवक आघाडी जाहीर निषेध करत आहे. 


              सदरील आरोपीस तात्काळ अटक न झाल्यास पांडे येथील अन्यायग्रस्थ समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) युवा आघाडीचे तालुका अध्यक्ष यशपाल कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार दि. 27/5/22 रोजी सकाळी ठीक 11:30 वा. गायकवाड चौकातून तहसील कार्यालयासमोर हलगीनाद मोर्चा काढण्यात येणार आहे. अशा प्रकारचे निवेदन तहसिल कार्यालय करमाळा येथे देण्यात आले आहे.

Post a Comment