Header Ads Widget

 



करमाळा- प्रतिनिधी (प्रशांत भोसले)

                        करमाळा तालुक्यातील तालुकास्तरीय विविध समितीची निवड मा.जिल्हाधिकारी व पालकमंत्री सोलापूर यांच्या आदेशानुसार झाली. त्यामध्ये महत्वाच्या 21 समितीत सदस्य, अध्यक्ष असे निवड करून त्यांना पत्र देण्यात आले. यावेळेस समिती निवडी संदर्भात सर्व पक्षाचे पदाधिकाऱ्यांसह निवडी करण्याचा प्रयत्न झालेला दिसुन येत आहे. परंतु पदसंख्या व कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या संख्येचा विचार करता, सर्वांना घेणे अशक्यच!!!! त्यामुळे बरेच ईच्छुकांची, समितीत जाऊन करमाळा तालुक्यातील व शहरातील नागरिकांची सेवा करण्याची ईच्छा अपुर्ण राहीली. तरी ह्या सर्व बाबतीत विचार करून, सामान्य व गरजु नागरिकांना यांचा पारदर्शक पणे लाभ मिळावा. यासाठीच महाराष्ट्र नवनिर्माण सेना करमाळा तालुक्याच्या वतीने संजय घोलप मनसे तालुकाध्यक्ष यांच्या संकल्पनेतून ज्या प्रकारे मा.जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांच्या कडुन तालुकास्तरीय समिती निवडी झाल्या. त्याच पध्दतीने (शाॅडो) तालुकास्तरीय समितीची स्थापना मनसे सैनिक व स्थानिक सामाजिक कार्यकर्ते घेऊन करण्याचा माणस आहे.


                  नगरपालिका दक्षता समिती, संजय गांधी निराधार समिती, तक्रार निवारण समिती, भष्ट्रचार निर्मुलन समिती, तंटामुक्त समिती, शांतता समिती, विधुत नियंत्रण समिती व महत्वाच्या उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य समितीत अशा सर्व तालुक्यातील समितीत पारदर्शकता व सर्व सामान्य माणसांपर्यंत योजना पोहचवण्यासाठी हि समिती काम  करणार आहे. राज ठाकरे पक्षप्रमुख व दिलीप धोत्रे मनसे नेते, प्रशांत गिड्डे यांच्या प्रेरणेतून नेहमीच सेवा करत राहणार. असे मनसे तालुकाध्यक्ष संजय घोलप यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तरी अशी (शाॅडो) समिती स्थापन करण्याचा उद्देश या सर्व योजनांतून योग्य गरजु पात्र जास्तीत-जास्त नागरिकांना फायदा व्हावा. तरी जे करमाळा तालुक्यातील व शहरातील सामाजिक कार्यकर्ते समितीत सेवा करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी संपर्क साधावा. असे आव्हान महाराष्ट्र नवनिर्माण सेना करमाळाच्या वतीने संजय घोलप यांनी केले आहे. तरी इच्छुकांनी पुढील नंबरवर संपर्क साधावा. मो.- 9011148077

Post a Comment