Header Ads Widget

 



 करमाळा-प्रतिनिधी (प्रशांत भोसले)

                    उजनी बरोबरच कुकडीच्या पाण्यासाठी ही लढा चालू ठेवणार असून, कुकडी पाणी परिषदेतून शेतकऱ्यांची मते जाणून घेणार असल्याची घोषणा माजी आमदार नारायण पाटील यांनी केली. उमरड ता. करमाळा येथील उजनी पाणी परिषदेत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विठ्ठल वलटे, अजिनाथ कोकरे, महादेव गोडगे, सिताराम पाखरे यांच्या हस्ते उजनी कलशाचे पुजन करण्यात आले. तर या पाणी परिषदेत प्रदूषण, पाणी वाटप कार्यक्रम, धरणग्रस्त राखीव पाणीसाठा, पाणी पातळी कमी झाल्यावर धरणपात्रात प्रत्यक्ष पाणी साठ्यापर्यंत शासन खर्चाने वीजेचे खांब आदि ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. यावेळी बोलताना मा. आ. पाटील म्हणाले की, उजनी निर्मितीसाठी केलेला त्याग व धरणग्रस्तांना मिळत असलेला धरणाचा फायदा, याचे पारडे किमान समान तरी असावे. धरणग्रस्तांचे राखीव पाणी व त्यासाठी दिला जाणारा वीज पुरवठा यासाठी आपण सदैव तत्पर राहून राजकीय ताकद पणाला लावणार आहोत. तसेच कुकडीचे हक्काचे पाच टि.एम.सी. पाणी आज करमाळा तालुक्याला मिळत नाही. टेल टू हेड या नियमाची अंमलबजावणी होत नसून, यावर उपाय म्हणून कुकडीचे पावसाळ्यात ओव्हर फ्लो होणारे किमान पाच टि.एम.सी. पाणी उजनीत साठवावे. व उपसा सिंचन योजना राबवून सदर पाणी आवर्तनाच्या माध्यमातून कुकडी चारी मधूनच समाविष्ट गावाना शेतीसाठी दिले जावे. ही आपली सन २०१८ पासूनची मागणी आहे. यासाठीचा आपला पाठपुरावा चालूच असून, शासनाला सकारात्मक भुमिका घ्यायला लावण्यासाठी आपण प्रयत्न करतच राहणार असल्याचेही नारायण पाटील यांनी सांगितले.


                 यावेळी डाॅ. बंडगर, राजाभाऊ कदम, गहिनीनाथ ननवरे, दत्ता सरडे, बिभीषण आवटे व प्रा. डाॅ. संजय चौधरी यांनी विचार मांडले. सुत्रसंचलन अंगद पठाडे यांनी केले. तर आभार माजी सरपंच संदिप मारकड यांनी मानले. या पाणी परिषदेस बिभीषण आवटे, गहिनीनाथ ननवरे, दत्ता सरडे, प्रा संजय चौधरी, प्रा अर्जुन सरक, राजाभाऊ कदम, गणेश घौधरी, दत्ता गव्हाणे, रसूल शेख, दादासो कोकरे, गंगाराम वाघमोडे, श्रीमान चौधरी, डाॅ. अशोक शेळके, नेमिनाथ सरडे, साहेबराव मारकड, चंद्रशेखर पाटील, अरुण शेळके, सोमा घाडगे, अंगद गोडगे, सर्जेराव रिटे, संभाजी रिटे, अंगद पटाडे, कुंडलिक चोरमले, इरफान शेख, बलभीम घोरमले, राहूल गोडगे, भाऊ चोरमले, नागनाथ कोकरे, कल्याण मोरे, शंकर लोखंडे, भास्कर पडवळे, महादेव वलटे आदि उपस्थित होते.

Post a Comment