केम-प्रतिनिधी (संजय जाधव)
करमाळा तालुक्यातील केम येथील जागृत ग्रामदैवत श्री ऊत्तरेश्वर मंदिरात आज सोमवारी सोमवत्ती अमावस्या निमित्त शिवलिंगास जेजुरीच्या खंडेरायाची आरास मंदिराचे पुजारी बाळू गुरव, गणेश गुरव यांनी केली होती. शिवलिंगास खंडेरायाचा मुखवटा तयार केला. याला भरजरी पगडी केली, शिवलिंगासमोर भंडारा टाकला होता. आज भाविकांना शिवलिंगाच्या रूपात जेजूरीच्या खंडेरायाचे दर्शन झाले. त्यामुळे भाविकात आनंद निर्माण झाला होता. तसेच मंदिरात शुभम वेदपाटक याने सुंदर अशी रांगोळी काढली होती. या रांगोळीमध्ये जेजुरी असे अक्षर लिहले होते. हि रांगोळी भाविकांचे लक्ष वेधून घेत होती.
आज मंदिरामध्ये सोमवत्ती अमावस्या असल्यामुळे, भाविकांनी गर्दी केली होती. या सजावटीचे श्री ऊत्तरेश्वर देवस्थान ट्रस्टचे चेअरमन दादासाहेब गोडसे, विश्वस्त मनोज सोलापूरे, अरूण वासकर, भाऊसाहेब बिचीतकर, मोहन दौड, विजय तळेकर व श्री ऊत्तरेश्वर देवस्थान महंत जयंतगिरी महाराज यांनी कौतुक केले.



Post a Comment