उपळवटे-प्रतिनिधी (संदीप घोरपडे)
माण तालुक्यातील डिंगरेवाडी येथे दशमान गोसावी समाज मुरारगिरी महाराज पुण्यतिथी पालखी सोहळा संपन्न झाला आहे. या कार्यक्रमाला पाच वर्ष पूर्ण झाली असून, येणाऱ्या सर्वांना महाप्रसादाची व्यवस्था देखील करण्यात आली होती. ह.भ.प सोनटक्के महाराज यांचे कीर्तन ठेवण्यात आले होते. गावातील मंडळींनी भजनाचा कार्यक्रम या ठिकाणी घेतला होता. दशनाम गोसावी हा समाज पूर्ण विखुरलेला आहे. तरीसुद्धा असे सामाजिक कार्यक्रम गोसावी समाज स्वतःच्या खर्चाने करत असतात. शासनाने या समाजाकडे लक्ष घातले पाहिजे. परंतु शासनाचे या समाजाकडे लक्ष नाही, या समाजाला शासनाने मदत केली पाहिजे.
मुरारगिरी सामाजिक संस्था या नावाने रजिस्ट्रेशन केलेले आहे. अध्यक्ष किशोरगिरी, उपाध्यक्ष अरविंदगिरी, खजिनदार अमितगिरी, सचिव महेश गोसावी, सहसचिव प्रदीपगिरी, कार्याध्यक्ष रमेशगिरी, सेक्रेटरी डॉक्टर महेशगिरी व सर्व सदस्य समितीने हा कार्यक्रम साजरा केला. ह.भ.प पद्माकर महाराज रसाळ कल्याण व सोनटक्के यांचे प्रवचन झाले. तपोनिधी मुरारगिरी महाराज समाधी पूजन व फुल अर्पण सोहळा येथे पार पडला आहे. याठिकाणी तपोनिधी दिलीपपुरी हिरपूरी महाराज मठाधिपती औंध या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी उपस्थित आमदार जयकुमार गोरे, सौ. रंजना हरिभाऊ जगदाळे पंचायत समिती माण सभापती, डिंगरेवाडी सरपंच भामाबाई पोपट जगदाळे, शशिकांत गायकवाड उपसरपंच, पोलीस पाटील व सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते.



Post a Comment