Header Ads Widget

 



करमाळा-प्रतिनिधी (प्रशांत भोसले)

                  उद्या वांगी येथे होणार्‍या उजनी पाणी परिषदेत 'उजनी कलश पुजन' होणार असून, माजी आमदार नारायण पाटील यांच्या भाषणाकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. पाटील गटाच्या वतीने दि २६ मे ते ६ जून दरम्यान आयोजित "उजनी पाणी परिषद" उद्यापासून सुरु होत असून, उजनी बॅकवॉटर परिसरातील दहा गावात या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक सभा ही सायंकाळी सात वाजता सुरु होणार असून, सभेच्या सुरूवातीस उजनी कलशाचे पुजन उजनी धरण निर्मिती प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहिलेल्या परिसरातील जेष्ठ शेतकऱ्याच्या हस्ते केले जाणार आहे. 


                         विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांनी मुकसंमती देत इंदापूर येथील नियोजीत उपसा सिंचन योजनेस हिरवा कंदील दाखवला असून, याचे करमाळा तालुक्यातील उजनीवर अवलंबून असलेल्या शेतीवर होणारे गंभीर परिणाम उजनीची सद्यस्थिती, उजनीच्या निर्मितीचा त्यागमय इतिहास, पुनर्वसन व अठरा नागरी सुविधांचे प्रश्न, उजनी पाणी नियोजन, पाणी उपलब्ध असताना सुद्धा उन्हाळ्यात जाणीवपूर्वक वीजपुरवठा खंडीत करणे. यासह उजनी पाणी प्रदुषण आदि विषयावर या पाणी परिषदेत गंभीर चर्चा होणार असल्याची माहिती पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी दिली. कोरोना कालावधी संपल्यानंतर माजी आमदार नारायण पाटील प्रथमच जाहीर सभेत भाषण करणार असल्याने, आता ते काय बोलणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. वांगी येथील उद्याच्या सभेची तयारी तसेच उमरड येथे परवा होणार्‍या सभेच्या नियोजनासाठी सभेची जबाबदारी सोपवलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांची एक बैठक आज जेऊर येथे दुपारी बारा वाजता होणार असून, या बैठकीस पाटील गटाचे मार्गदर्शक प्रा. अर्जून सरक व तालुकाध्यक्ष प्रा. डाॅ. संजय चौधरी हे मार्गदर्शन करणार असल्याचे ही तळेकर यांनी सांगितले.

Post a Comment