करमाळा-प्रतिनिधी
आदिनाथ सहकारी साखर कारखाना सुरू व्हावा, यासाठी कारखान्यातील कामगारांनी व शेतकरी कामगार संघर्ष समितीने कामगारांना न्याय मिळावा यासाठी आंदोलने केली. कारखान्यामध्ये करोडो रुपयांची साखर पडून होती. साखरेच्या माध्यमातून कामगारांना त्यांची सहा वर्षांपासून रखडलेली रक्कम मिळेल ही आशा कुठेतरी दिसून येत होती. आणि सरतेशेवटी या आंदोलनाला यश आले, शिखर बँकेचे कार्यकारी संचालक आणि इतर पदाधिकारी यांनी आदिनाथ कारखान्यातील कामगार आणि दशरथ (अण्णा) कांबळे यांच्याशी एस. पी. ऑफीस सोलापूर येथे समन्वय बैठक घेऊन कामगारांना शिल्लक साखरेतून पैसे देण्याचे कबूल केले. त्यामुळे कामगारांमध्ये उत्साह संचारला व कुठेतरी आजपर्यंत केलेल्या आंदोलनाला यश आल्याचे समाधान मिळाले. परंतु संचालक मंडळाच्या पोटामध्ये या सर्व घडामोडींनी आगडोंब उसळत होता. कारण 481 कामगारांना मिळणाऱ्या पैशा बरोबर कारखान्याच्या नावाखाली संचालक मंडळाने, 11/04/2022 रोजी कामगार औद्योगिक न्यायालयात कारखान्यासाठी 300 रुपये मिळावे यासाठी अपील केले. संचालक मंडळाच्या या अपीलाला न्यायालयाने 25/04/2022 धुडकावून लावले. त्यामुळे संचालक मंडळाच्या आडून विविध खेळ्या करणाऱ्या बागल यांना ही मोठी चपराक होती. दि. 16/05/2022 रोजी कारखान्यातील आतापर्यंत 63,790 क्विंटल साखर विक्री झाली असुन, या साखरेचे कामगारांना ठरलेल्या द्यावयाचे 150 रु. प्रमाणे 95,68,500 रु. बँकेने जमा करुन ठेवले आहेत. सदरिल जमा रक्कम शिखर बँक प्रशासन कामगारांच्या खात्यावर जमा करु इच्छित आहे. परंतु कोणत्या कामगाराला किती पगार आहे? व सदरिल जमा रकमेचे वितरण करण्यासाठी संचालक मंडळाकडे सर्वांचे पगारपत्रक व हजेरीपत्रक आहे. सदरिल हजेरीपत्रक व पगारपत्रक संचालक मंडळ न्यायालयामध्ये काही केल्यास देण्यासाठी तयार नाही. यासंदर्भात कामगार औद्योगिक न्यायालयामध्ये या बाबीवर कामगारांनी अपील केले असता, संचालक मंडळ उडवाउडवीची उत्तरे देत आहे. कारखाना परिसरामध्ये लाईट नाही. किंवा प्रिंट काढण्यासाठी अॉपरेटर उपलब्ध नाही. त्यामुळे आम्हाला अडचणी येत आहेत. अशी मुर्खपणाची संचालक मंडळ उत्तरे देत असल्यामुळे, कामगारांप्रती संचालक मंडळाला पुतना मावशीचे किती प्रेम आहे हे कळून येते.
काही दिवसांपुर्वी करमाळा तालुक्यामध्ये आदिनाथ बचाव संघर्ष समिती कार्यरत झाली होती. या समितीच्या मागणीनुसार आदिनाथच्या संचालक मंडळाने आमसभा घेत बारामती ॲग्रोचा करार रद्द केला असल्याचे पत्रक काढले. यानंतर बारामती ॲग्रोचे सर्वेसर्वा रोहित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले कि, आदिनाथ कारखाना आम्हीच सुरु करणार. यानंतर आदिनाथ भोवतीचे सुरु झालेले राजकारण कुठे थांबले. यावेळेस बागलांनी सुध्दा मोठेपणा असा आणला कि, आदिनाथ बचाव समिती आणि आमचा काहीच संबंध नाही. बागलांनी आदिनाथचे सर्व वातावरण शांत होऊ दिले. व परत एकदा न्यायालयात बागलांनी बारामती ॲग्रोच्या विरोधात अपील दाखल करुन, आदिनाथ कारखाना सुरु करण्याच्या करारात आडकाठी आणली गेली. या सर्व प्रकारावरुन असे दिसुन येते कि, आदिनाथ बचाव समिती हि बागल यांनीच स्वतःच्या स्वार्थासाठी निर्माण केली होती. यामध्ये समितीला यश न मिळाल्यामुळे, सरतेशेवटी बागल यांनीच त्यांचा असली रंग दाखवायला सुरुवात केली आहे. तरी आदिनाथ कारखाना हा जर पुर्ववत सुरु करायचा असेल, तर हे सर्व पवार घराणेच करु शकते.
आदिनाथ कारखाना बंद पडला तेव्हा हेच बागल कुटुंब, पवार घराण्याकडे आदिनाथ कारखाना सुरू करा. अशी मागणी घेऊन व हात जोडून त्यांच्या दारामध्ये उभे होते. यावरून असे सिद्ध होते की, बागल हे कारखाना चालवण्यासाठी सक्षम नव्हते. यामुळे आदिनाथ कारखाना बँकेने 15 वर्षांऐवजी 25 वर्ष बारामती ॲग्रोला द्यावा. अशा प्रकारचा ठराव सभासदांची आमसभा घेत, व संचालक मंडळाचा ठराव घेऊन, नियमबाह्यपणे कारखाना 25 वर्षांसाठी चालविण्यास दिला. आता काही वर्षांनी का असेना, रोहित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले की, आम्ही कारखाना चालविणार. त्यावेळेस बागल यांना सुद्धा अचानक स्वतःच्या राजकारणाच्या अस्तित्वाची चाहूल लागलेली असावी असेच कुठेतरी दिसून येते. कारण करमाळा तालुक्यातील राजकारण हे आदिनाथ कारखान्याभोवती बहुतांशी फिरते. असो.... संचालक मंडळाच्या आडुन बागल यांनी डी. आर. टी. कोर्टामधून बारामती ॲग्रोने कारखाना सुरु करण्यावर स्थगिती आणली. यावरून असे स्पष्ट होते की, बागल यांना परत एकदा आदिनाथ कारखाना सुरू करण्याची अचानक इच्छा झालेली असावी. परंतु आमचा याठिकाणी असा प्रश्न आहे की, तुम्ही आधीच कशाला कारखान्या संदर्भात नियमबाह्य झक मारण्याचे काम केले. तरी बागल यांनी पवारांना कारखाना सुरु करण्यासंदर्भात आता जर विरोध सुरु केला असेल. तर आदिनाथ कारखाना सुरू करण्यासंदर्भात बागल यांचे नियोजन काय आहे? हे स्पष्ट करावे, कारखाना कशाप्रकारे सुरू होणार? किती वेळात सुरू होणार? कामगार, ऊस वाहतूकदार, ऊस तोडणी कामगार यांचे नियोजन कशा प्रकारे केले जाणार? अशा काही प्रश्नांची त्यांनी जाहीरपणे उत्तरे द्यावीत. व येणाऱ्या पुढील हंगामात आदिनाथ सहकारी साखर कारखाना लवकरात-लवकर सुरू करावा. जर बागल यांनी येणाऱ्या हंगामात कारखाना सुरू केला. तर शेतकरी कामगार संघर्ष समिती बागल यांचा करमाळ्यातील सुभाष चौकात भव्यदिव्य असा सत्कार समारंभ करेल. आणि बागलांनी कारखान्यासंदर्भातील नालायकपणा अथवा पोरखेळपणा वेळीच थांबवला नाही. तर तालुक्यातील जनता तुमचे सर्वस्वी राजकारण संपविल्याशिवाय राहणार नाही. व शेतकरी राजा हि तुम्हाला कधीच माफ करणार नाही. हे तुम्ही वेळीच ध्यानात घेतले पाहिजे.




Post a Comment