करमाळा-प्रतिनिधी
सध्या उन्हाळ्यात घोटी गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असुन, ग्रामपंचायतने माञ गावकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. ग्रामस्थांना 4-5 किमी अंतरावर पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. सध्या महागाईमुळे पेट्रोलचे भाव गगनाला भिडले असताना, गावकरी डोक्यावर हंड्याने पाणी वाहत आहेत. सध्याची परिस्थिती खुप भयानक आहे. पाणीपट्टी भरून ही गावकऱ्यांना पाणी मिळत नाही. तसेच पर्यायी बोअरवेल मधुन मिळणाऱ्या पाण्याची सोय चालु होती. पण कडक उन्हामुळे त्यामधील पाणी आटले आहे. थोडेफार पाणी काही बोअरवेल मधुन मिळते, तर त्यांची दुरुस्तीची कामे ग्रामपंचायतीने केली नसल्याने, पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न उभा आहे. 27 मे पर्यंत ग्रामपंचायतने नळपाणी पुरवठा योजना पूर्ववत करावी. अथवा पर्यायी टँकरची सोय करावी. अन्यथा 28 मे रोजी घोटी ग्रामस्थांकडून ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकुन ग्रामपंचायत बंदचा इशारा दिला आहे.
सत्तेत येण्यापूर्वी सध्याच्या सत्ताधारी पॅनलने अनेक आश्वासने दिले होती. त्यामधील गावाला 24 तास पाणी दिले जाईल असे बोलले होते. सत्तेमुळे या लोकांना दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला आहे. त्यामुळे घोटी ग्रामस्थांसह आ.रोहीतदादा पवार फॅन्स क्लबचे करमाळा तालुका अध्यक्ष शुभम राऊत-पाटील यांनी ग्रामपंचायत बंदचा इशारा दिला आहे. ग्रामपंचायत बंद आंदोलनाचे निवेदन करमाळा तहसिलदार, गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत घोटी व पोलीस स्टेशन केम येथे देण्यात आले आहे.




Post a Comment