केम-प्रतिनिधी (संजय जाधव)
श्री उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेज केम येथील प्रा. डॉ. मच्छिंद्र नागरे यांचा "डॉ बापुजी साळुंखे आणि मराठवाडा" तसेच" संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे" या साहित्य लिखाणाबद्दल कोल्हापूर या ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात आला. शिक्षणमहर्षी डॉ.बापुजी साळुंखे जन्मशताब्दी महोत्सव सांगता समारंभ, कोल्हापूर या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. यावेळी या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमंत शाहू महाराज कोल्हापूर, अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज, कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्था सचिव प्राचार्या सौ. शुभांगीताई गावडे, सहसचिव प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ, मराठवाडा विभागप्रमुख प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख, कोल्हापूर विभागप्रमुख श्रीराम साळुंखे, संस्था सी.ई.ओ. कौस्तुभ गावडे व इतर मान्यवर उपस्थित होते.
या सांगता समारंभात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते या दोन्ही ग्रंथाचे विमोचन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे श्रीमंत शाहू महाराज, अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज, कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे ,संस्था सचिव प्राचार्य सौ. शुभांगीताई गावडे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने गुरुदेव कार्यकर्ते उपस्थित होते.




Post a Comment